
अवैधपणे गावठी पिस्टल बाळगणारे ४ लोकांना स्थानिक गुन्हे शाखेने पिस्टल व जिवंत काडतुससह केली अटक…
जालना- सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 17/10/2023 रोजी पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी
व अंमलदार यांना अवैध शस्त्र बाळणा-या इसमांची माहिती घेवून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार जालना शहरात अवैध शस्त्र बाळगणा-या ईसमांची माहिती घेत असतांना त्यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम
सुभाष विनायक डोलारे रा. राजेवाडी ता. बदनापुर जि. जालना



हा बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल स्वतःच्या ताब्यात बाळगत असल्याची माहिती मिळाल्यावरून सदर इसमाचा शोध घेतला असता तो सेलगाव ता. बदनापुर येथे वावरत असतांना त्यास शिताफिने ताब्यात घेऊन त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस
मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले त्यास विश्वासात घेऊन गावठी पिस्टल पुरवणारे इसमाबाबत विचारणा केली असता त्याने त्याचा मित्र

अमोल राजेंद्र देशमुख रा. शेलगाव ता. बदनापुर जि.जालना

सोनु संतोष जाधव रा. नुतन वसाहत जालना
यांच्या बाबत माहिती दिल्याने त्या दोघांना ताब्यात घेऊन सदर पिस्टल बाबत विचारपुस केली असता त्यांनी सुभाष डोलारे यास पिस्टल पुरवल्याचे व स्वतःकडे बाळगल्याचे कबुली दिली
असल्याने सदर इसमाविरुध्द स्थागुशाचे कृष्णा तंगे यांच्या फिर्यादीवरुन पोस्टे बदनापुर येथे गुरनं 453/2023 कलम 3/25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच दिनांक 17/10/2023 रोजी पोलिस ठाणे सदर बाजार हद्दीतील जुने पोस्ट ऑफीस जवळील अंबर हॉटेल समोर इसम नामे अनिल सुनिल पाटोळे हा बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल स्वतःच्या ताब्यात बाळगत असल्याची माहिती मिळाल्यावरून सदर इसमाचा शोध घेतला असता तो अंबर हॉटेल समोर मिळुन
आल्याने त्याची दोन पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याने कंबरेला लावलेली गावठी बनावटीची पिस्टल मिळुन आल्याने ती जप्त करण्यात असल्याने स्थागुशाचे पोउपनि राजेंद्र वाघ यांचे फिर्यादीवरुन पोस्टे सदर बाजार पोलिस ठाणे येथे गुरनं 846/2023 कलम 3/25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक . शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि रामेश्वर खनाळ, सपोनि श्री आशिष खांडेकर, पोउपनि राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे,
गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, सतीष श्रीवास, योगेश सहाने, कैलास चेके, सौरभ मुळे यांनी केली आहे.



