पार्किंगमधे उभ्या असलेल्या गाडीची काच फोडुन त्यातील मुद्देमाल लंपास करणाऱ्या सराईत चोरट्यास यवत पोलिसांनी घातल्या बेड्या…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

यवत(पुणे)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात हॉटेलसमोर असलेल्या पार्किंगमधून चारचाकी गाडीच्या काचा फोडून बॅगेची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला
यवत पोलिसांनी जेरबंद केले. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ८ ऑक्टोबर रोजी वाखारी गावाच्या हद्दीतील हॉटेल ‘निर्माण’ समोर उभ्या असलेल्या कारची पाठीमागची काच फोडून
मोबाईलसह १९ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा गुन्हा यवत पोलिस स्टेशन येथे दाखल करण्यात आला होता.याबाबत यवत पोलिस स्टेशन गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी पाहणी करून सीसीटीव्ही कॅमेरे व रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासले असता, पथकाला संबंधित गुन्हा

करण मोहन चव्हाण (रा. कुंभारी, सोलापूर, सध्या रा. ठाणे, किशननगर, सेक्टर १२)





याने केल्याची माहिती मिळाली. यावरून यवत गुन्हे शोध पथकाने कुंभारी (जि. सोलापूर) येथून संशयितास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता आरोपी करण चव्हाण याने दौंड, सासवड व यवत पोलिस स्टेशन हद्दीतील अनेक हॉटेलच्या पार्किंगमधून
वाहनांच्या काच फोडून गाडीतील बॅग चोरून नेली असून, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण हद्दीतील ११ गुन्हे उघडकीस आले. चोरीचा एकूण २ लाख ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी करण मोहन चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर पनवेल पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगिरी यवत पोलिस स्टेशन गुन्हे शोध पथकाने पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस उपनिरीक्षक सलीम शेख, वळसंग पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक उस्मान शेख, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरूनाथ गायकवाड, राजू मोमीन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार अक्षय यादव, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, पोलिस शिपाई
मारुती बराते, सुनील कोळी यांच्या पथकाने केली. याबाबत पुढील तपास सहाय्यक फौजदार बाळासाहेब गाडेकर करीत आहेत.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!