अल्पवयीन मुलांचे अपहरण करणारे दांपत्यास ७२ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

दि. १८/११/२०२३ रोजी कळमेश्वर हद्दीतील लोणारा शेत शिवारात राहणारे

श्री केशव श्रीराम आर्य वय ७० वर्ष रा. प्लॉट नं. २० सुबोध नगर, नागपूर





यांनी त्यांचे शेतात काम करण्याकरीता सोनू व त्याची पत्नी गिता रा. छिंदवाडा (मध्यप्रदेश) या दांपत्यांना सुमारे ८ महिण्यापासून शेतमजुरीच्या कामावर ठेवले होते. सोनू त्याची पत्नी गिता व मुलगी कु. नम्रता वय ८ वर्ष असे फिर्यादीचे शेतावर रहात होते. सुमारे ८ महिण्याचा पगार शेतमालक केशव आर्य यांनी या दोन्ही दांपत्त्यांना दिला नव्हता,त्यामुळे पगारासाठी त्यांनी शेतमालकाकडे तगादा लावला. मालक पगार देत नाही हे सोनू व गिता हयांचे लक्षात आले त्यामुळे त्या दोघांनी दि. १८/११/२०२३ रोजी पहाटे ६.०० वाजताचे सुमारास केशव आर्य यांची बजाज प्लॅटीना मोटरसायकल आणि
२५,०००/- रुपये रोख रक्कम चोरी केले व केशव आर्य यांच्या साळीचा मुलगा चि. आदीत्य वय १२ वर्ष याचे अपहरण
केले. सोनू याने त्याची पत्नी गिता, मुलगी नम्रता व आदीत्य यांचेसह केशव आर्य यांचे मोटरसायकलने लोणारा (कळमेश्वर) येथून पलायन केले. या घटनेची माहिती केशव आर्य यांनी पोलीस ठाणे कळमेश्वर येथे येवून दिली असता सोनू व त्याचे पत्नीचे विरुद्ध आदीत्यचे अपहरण केल्याचा गुन्हा कळमेश्वर पोलीसांनी नोंद करुन तपास सुरु केला. सदर घटनेची माहिती नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक  हर्ष पोद्दार यांना प्राप्त होताच त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष तपास पथके तयार करुन कळमेश्वर पोलिसांना व विशेष पथकास आरोपी व अपहृत बालकाचा शोध घेण्याचे आदेश दिले.
सदर गुन्हयातील आरोपी व अपहृत बालकाचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी कळमेश्वर हद्दीतील तसेच नागपूर येथील बस स्थानके, रेल्वे स्टेशन मार्केट परिसर अशा विवीध ठिकाणी शोध सुरु केला. तसेच तांत्रीक पध्दतीने तपास सुरु केला. त्याचप्रमाणे गोपनिय बातमीदार नेमुन आरोपी व अपहृत बालकाचे शोधकार्य रात्रं दिवस सुरु ठेवले. या शोध मोहिम दरम्यान स्थागुशाचे पथकास आरोपीचे नाव प्रविण उर्फ सोनू हरिराम पंडाग्रे रा. छिंदवाडा तसेच आरोपीची पत्नी हिचे नाव गिता कौरती रा. जुन्नारदेव जि. छिंदवाडा असे असल्याची खात्रीशिर माहिती हाती लागली. त्यावरुन पोलीसांनी मध्यप्रदेश येथील छिंदवाडा जिल्हयात जावून आरोपी व अपहृत बालकाचा शोध सुरु केला. यादरम्यान समजले की, आरोपी हा त्याचे पत्नीसह छिंदवाडा शहरातील चौरसिया मोहल्ला येथे येणार आहे. त्यानुसार विशेष
पथकाने चौरसिया मोहल्ला येथे आरोपीचा शोध घेण्याकरीता सापळा रचला. दि. २१/११/२०२३ रोजी सकाळी ०९.००
वाजताचे सुमारास आरोपी व त्याची पत्नी एका लहान मुलीसह दिसून येताच त्यांना ताब्यात घेतले आरोपीने त्यांची ओळख



१) प्रविण उर्फ सोनू हरिराम पंडाग्रे वय ३५ वर्ष



२) गिता गुरुप्रसाद कौरती वय २८ वर्ष आणि

३) कु. नम्रता गुरुप्रसाद कौरती वय ०८ वर्ष सर्व रा. कालीछापारनं. २ दमुहातह. दमुहाजि छिंदवाडा, असे सांगुन आरोपी प्रविण व त्याची पत्नी गिता यांनी आदीत्यचे अपहरण केल्याचे सांगीतले. त्यानंतर आरोपीस अपहृत मुलगा आदीत्य हा कुठे आहे याबाबत विचारले असता त्यांनी आदीत्य याला छिंदवाडा येथील

अर्जुन प्रकाश जाधव वय ३० वर्ष

व अमन कैलाश चौरसिया वय २८ वर्ष

यांचेकडे ठेवल्याची माहिती दिल्याने क्षणाचाही विलंब न करता तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अर्जुन व अमन याचे घरी जावून आदीत्य याचा शोध घेतला असता तो मिळून आला. तपास पथकाने व कळमेश्वर पोलिसांनी अतिशय कौशल्यपुर्ण
संवेदनशिल सदरचे प्रकरण हाताळले तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेश येथील छिंदवाडा येथे सापळा रचून दोन्ही आरोपी दांपत्यांना ताब्यात घेवून अपहृत बालक आदीत्य याची सुटका सरक्षितरित्या केली. आरोपी व अपहृत बालकास पुढील तपास प्रक्रियेकरीता कळमेश्वर पोलिसांचे स्वाधिन केले. सदर गुन्हयाचे चौकशी दरम्यान माहिती मिळाली की, आरोपी प्रविण उर्फ सोनू हरिराम पंडाग्रे हा सराईत अपराधी असून त्याचेवर मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील विवीध जिल्हयात खून, दरोडा, जबरी
चोरी, घरफोडी, चोरी अश्याप्रकारचे गुन्हे नोंद आहे.
सदरची  कार्यवाही ही नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार,अपर पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, सावनेरचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधीकारी  बापू रोहम, यांचे मार्गदर्शनात ओमप्रकाश कोकाटे, पोलिस निरीक्षक, सहा. पोलीस निरीक्षक, राजीव कर्मलवार,  आशिष ठाकुर, पोलिस उपनिरीक्षक बटुलाल पांडे, सहा. फौजदार सुरज परमार, पोलिस हवालदार दिनेश आधापूरे, निलेश बर्वे, संजय बानते, इक्बाल शेख, विनोद काळे, प्रमोद तभाने, अमोल कुथे, मुकेश शुक्ला तसेच पोलिस नायक सतिष राठोड, सुमीत बांगडे स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण तसेच पोलिस स्टेशन कळमेश्वर येथील पोलिस निरीक्षक  यशवंत सोलसे, सपोनि दिलीप पोटभरे, तेजराम मेश्राम, सफौ जमन्नान नौरंगाबादे, पोलिस हवालदार पंकज गाडगे, वानखेडे, पोलिस शिपाई राणा सिंग, सायबर सेलचे पोलिस उपनिरीक्षक भारत थिटे, महिला पोलिस हवालदार स्नेहा ढवळे, पोलिस नाईक सतिश राठोड यांचे पथकाने पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!