पिस्टल बाळगल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी केली चौघांना अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

पिस्टल बाळगल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी केली चौघांना अटक

पिंपरी (महेश बुलाख): बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट दोनने चार जणांना अटक केली. ही कारवाई पीडब्ल्यूडी मैदानाजवळ सांगवी येथे केली. हरीश काका भिंगारे (34, रा. औंध रोड, पुणे), गणेश बाळासाहेब कोतवाल (30, रा. नवी सांगवी), शुभम
जगन्नाथ पोखरकर (30, रा. पाषाण, पुणे), अरविंद
अशोक कांबळे (42, रा. पौड, ता. मुळशी) अशी अटक
केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार आतिश कुडके यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.





पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानाजवळ काहीजण संशयितपणे थांबले असून त्यांच्याकडे पिस्टल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मैदानाजवळ सापळा लाऊन चौघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे असा एकूण एक लाख दोन हजार 500 रुपये किमतीचा ऐवज आढळून आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!