गोंदीया पोलिस अधीक्षकांचे आदेशाने कुख्यात टोळी विरोधात मकोका अंतर्गत कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

गोंदिया – पोलिस उप-महानिरीक्षक संदीप पाटील यांचे आदेशांन्वये पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांची सन- 2023 मध्ये मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा सन- 1999) *(Maharashtra control of organised crime act 1999) अंतर्गत कारवाई-

कुख्यात टोळी प्रमुख- अभिषेक ऊर्फ जादू वर्मा व त्याचे टोळीतील इतर 02 सदस्याविरूध्द मकोका (MCOCA) कायदा अन्वये कार्यवाही,पोलिस अधीक्षक, गोंदिया निखील पिंगळे, यांनी गोंदिया जिल्हयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर जिल्हयातील गुन्हेगारी पार्श्वभूमी, पुर्व इतिहास लक्षात घेवुन, जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकामी वाढती संघटीत गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्याकरीता, संपुर्ण गोंदिया जिल्हयातील संघटीतरित्या गंभीर गुन्हे करणारे गुन्हेगार यांचे विरुध्द कडक धोरण राबविण्याबाबत निर्देश दिलेले आहेत





या अनुषंगाने पोलिस स्टेशन गोंदिया शहर अंतर्गत दाखल गुन्हा क्र. 708/2023, कलम 454, 457, 380 भादवि अंतर्गत गुन्हयातील संघटितरित्या गुन्हे करणारे आरोपी- 1) अभिषेक ऊर्फ जादू प्रेमलाल वर्मा वय 19 वर्ष, रा. रामचंद्र आईल मिल जवळ, श्रीनगर, गोंदिया तालुका जिल्हा – गोंदिया. 2) घनश्याम ऊर्फ गोलू अशोक चौधरी वय 19 वर्ष रा. श्रीनगर, मालविय वॉर्ड, गोंदिया 3) उदय ऊर्फ आवु उमेश उपाध्याय वय 19 वर्ष, रा. मुर्री चौकी समोर, गोंदिया यांनी नमूद गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना गुन्हयात अटक करण्यात आली,. सदर गुन्हयाचे तपासात असे निष्पन्न झाले कि, नमूद गुन्हेगार आरोपीतांनी संघटीतरित्या टोळी निर्माण करुन गोंदिया जिल्हयात त्यांची टोळी सक्रीय करुन जनसामान्यांच्या मनात भय व हिंसेचे वातावरण निर्माण केला आहे. त्यांचा अंतीम हेतु स्वतः करीता आर्थीक फायदा मिळविणे हे आहे. त्यांचे टोळीने सन 2019 पासुन ते आज पावेतो गुन्हयाची मालीका केलेली आहे, या टोळी विरुध्द इतराचे जिवीतास किंवा वैयक्तीक सुरक्षिततेस धोक्यात आणणारी कृती करणे जबरी चोरी करतांना ईच्छापुर्वक दुखापत करणे, आपखुसीने दुखापत करणे, हमला करणे किंवा, खंडणी वसुल करणे, खुनाचा प्रयत्न करणे, चोरी करणे, घरफोडी करणे ईत्यादी शिर्षकाखाली गंभीर गुन्हे केलेले असुन टोळीची दहशत राहावी म्हणुन हत्यार जवळ बाळगुन नागरीकांमध्ये दहशत माजविने अशी कृत्य केली असुन त्यांचे टोळी विरुध्द एकुण 15 गुन्हयांची नोंद आहे. सदर गैरकृत्याव्दारे मिळणारे पैशांवर नमूद गुन्हेगार हे एैश आरामाचे, आणि चैनिचे जिवन जगत आहे. .



सदर आरोपीतांच्या गुन्हेगारी वृत्तीची सखोल माहिती घेवुन वेळीच दखल घेत पोलिस अधिक्षक, गोंदिया  निखील पिंगळे, यांनी स्थानीक गुन्हे शाखा गोंदिया व पोलिस स्टेशन गोंदिया शहर यांना सदर संघटीत टोळी विरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्याबाबत आदेशीत केले होते..यावरून पोलिस स्टेशन गोंदिया शहर व स्थानीक गुन्हे शाखा गोंदिया यांनी सदर गुन्हयातील नमूद तिन्ही आरोपीविरुध्द मोक्का अंतर्गत प्रस्ताव तयार करुन सदरचा. प्रस्ताव पोलिस अधीक्षक गोंदिया यांनी  पोलिस उप महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र कॅम्प नागपूर यांना मंजुरीस्तव सादर केले. दिनांक 04/12/2023 रोजी पोलिस उप महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र कॅम्प नागपूर यांनी पोलिस स्टेशन गोंदिया शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 708/2023,कलम 454,457,380भादवि या गुन्हयातील-



*टोळी प्रमुख-➖*
*1) अभिषेक ऊर्फ जादू प्रेमलाल वर्मा वय 19 वर्ष, रा. रामचंद्र आईल मिल जवळ, श्रीनगर, गोंदिया तालुका जिल्हा – गोंदिया.* व*

*टोळी सदस्य*➖
*2) घनशाम ऊर्फ गोलू अशोक चौधरी वय 19 वर्ष रा. श्रीनगर, मालविय वॉर्ड, गोंदिया*

*3) उदय ऊर्फ आवु उमेश उपाध्याय वय 19 वर्ष, रा. मुर्री चौकी समोर, गोंदिया*

यांचेविरुध्द मकोका अतर्गत कलमवाढ करुन पुढील तपास करण्याचे आदेश पारीत केले आहेत सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री. सुनिल ताजने, उपविभागीय पोलिस अधीकारी गोंदिया हे करीत आहेत…

पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मोक्का अंतर्गत केलेल्या कारवाईमुळे जिल्हयात संघटीतरित्या गुन्हेगारी करणा­ऱ्या गुन्हेगारांच्या मनात दहशत निर्माण झाली असुन यापुढेही संघटीतरित्या गुन्हे करणा­ऱ्या विरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार आहे त्यामुळे संघटितरीत्या गुन्हे करणा­ऱ्या गुन्हेगारांची खैर नाही,

सदरची मकोका कारवाई (MCOCA) पोलिस अधीक्षक गोंदिया,  निखील पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक,  नित्यांनंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी उपविभाग गोंदिया, सुनील ताजने, यांचे मार्गदर्शनाखाली,  दिनेश लबडे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया, पो.नि. चंद्रकांत सुर्यवंशी, प्रभारी पो.स्टे. गोंदिया शहर, तत्कालीन प्रभारी . सचिन म्हेत्रे, पो. स्टे. गोंदिया शहर, यांचे नियंत्रणाखाली, पोलिस उपनिरीक्षक वनिता सायकर, पो.हवा. चेतन पटले स्था.गु.शा. गोंदिया व गोंदिया शहर येथील तपासी अधिकारी स.पो. नि.सागर पाटील,पो. हवा. जागेश्वर उईके, दिनेश बिसेन, व डी.बी.पथक पो.स्टे. गोंदिया शहर यांनी कारवाई पार पाडली आहे….





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!