मोटारसायकल चोरणारे सराईत चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

 मोटार सायकली चोरी करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना चोरी केलेल्या 08 मोटर सायकलीसह अटक,स्थानिक गुन्हे शाखेच्या  पथकाची कामगिरी…..

गोंदिया(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक  नित्यानंद झा, यांनी पोलिस निरीक्षक -दिनेश लबडे, स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांना जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या मोटार सायकल चोरी व मालमत्ता विषयक गुन्हयातील गुन्हेगारांचा शोध घेवून मोटारसायकल  चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना जेरबंद करून गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते





या अनुषंगाने पोलिस निरीक्षक- दिनेश लबडे, यांनी स्था. गु. शां. पोलिस अधिकारी- अंमलदार यांना याबाबत सूचना देवुन गुन्हे उघडकीस आणण्याचे मार्गदर्शन करण्यात आले होते,याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पथकाद्वारे जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या मोटार सायकल चोरी, व मालमत्ता विषयक गुन्हयातील गुन्हेगारांची संपुर्ण माहिती घेण्यात येवून गुन्हे शाखा पथका कडून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते



स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोटार सायकली चोरी करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती घेत असताना दिनांक 11/12/ 2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गस्तीदरम्यान गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की,आकाश पवार रा. हनुमान गल्ली, लक्ष्मी नगर गोंदिया यांचेकडे चोरीची मोटार सायकल आहे अशा प्राप्त माहिती वरुन सराईत गुन्हेगार – 1) आकाश कमलाकर पवार वय 27 वर्षे राहणार हनुमान गल्ली लक्ष्मी नगर गोंदिया* यास ताब्यात घेण्यात आले व त्यास मोटारसायकल चोरी संबंधात विचारणा केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडविचे उत्तरे दिली विश्वासात घेवून पुन्हा विचारपूस केली असता त्यांनी त्याचा *साथीदार अजय तेलंग रा. गौतमनगर गोंदिया* याचेसोबत मिळून चोरी केल्याचे सांगितले यावरून गुन्हेगार2) अजय श्रीरामजी तेलंग वय 32 वर्षे राहणार गौतम नगर बाजपेयी वॉर्ड गोंदिया* यास ताब्यात घेण्यात आले दोन्ही आरोपी यांचे ताब्यातून त्यांनी गोंदिया, मध्य प्रदेश, छत्तीसगड, अश्या विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या 8 मोटार सायकली एकूण किंमती 4,70,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आले आहे सदर जप्त मोटार सायकल पैकी 1 मो.सा. ही पो. स्टे. गोंदिया शहर दाखल गुन्ह्यातील असल्याने दोन्ही आरोपींना जप्त मोटर सायकल मुद्देमालासह गोंदिया शहर पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले आहे पुढील  तपास गोंदिया शहर पोलिस करीत आहेत



सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक- दिनेश लबडे, यांचे नेतृत्वात पो. उप.नि.महेश विघ्ने, वनिता सायकर,पोलिस अंमलदार सफौ.अर्जुन कावळे, पो. हवा. इंद्रजित बिसेन, राजू मिश्रा,भुवन देशमुख,सोमेंद्र तूरकर,रियाज शेख, महेश मेहर, नेवालाल भेलावे, कोडापे, सुजीत हलमारे, लक्ष्मण बंजार, संतोष केदार, यांनी कामगिरी बजावलेली आहे…..





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!