मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी करणारी टोळी गजाआड

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी करणारी टोळी गजाआड

परभणी – पाथरी पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल टॉवर च्या दरवाजाचे कुलूप तोडून बॅटऱ्या चोरी करणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणी फिर्यादी कैलास रघुनाथराव मगर, रा.मगर सांगवी, ता.मानवत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भा.दं.सं. कलम 530/2023 कलम 457, 511, 427, 34 आणि 380 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.





या बाबत अधिक माहिती अशी की, मोबाईल टॉवरच्या रुमचा दरवाजा कुणीतरी उघडून बॅटऱ्या चोरून नेत आहे. अशी माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाणे येथील रात्रपाळी पेट्रोलींग ड्युटीस असणारे पोलीस अंमलदार तात्काळ घटनास्थळी पोहचले असता तेथे चार आरोपी मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चारचाकी मालवाहू गाडीत टाकून चोरून नेत असताना दिसले. आरोपींची नावे – 1) शेख शाहरुख शेख खालेद (वय 27 वर्ष), रा.मलंग शहा मोहल्ला परतुर जि.जालना,2) सिराज खान अब्दुल्ला खान (वय 40 वर्ष), रा.यासिन नगर हर्सल सावंगी औरंगाबाद, 3) अन्वर अब्दुल्ला खान वय (42 वर्ष) रा.यासिन नगर हर्सल औरंगाबाद, 4) शेख अरबाज शेख जमीर रा.फकीरवाडी औरंगाबाद,  त्यापैकी अ.क्र.1 ते 3 हे पळून जात असताना पोलीसांनी पाठलाग करून पकडले. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या मोबाईल टॉवर च्या 1,50,000/- रुपयांच्या बॅटऱ्या, गुन्ह्यात चोरी करण्याकरीता वापरण्यात आलेली चारचाकी वाहन व 5 मोबाईल, तसेच चोरी करण्याकरीता आवश्यक साहित्य असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.  तसेच आरोपींनी आष्टी, जालना येथे देखील अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबूली दिलेली आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!