जनावरे चोरणारी टोळी गजाआड,४ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

जनावरे चोरणारी टोळी गजाआड; 4 लाखांचा मुद्देमाल जप्त….

नांदेड (प्रतिनिधी) – गेले अनेक महिन्यांपासून जनावरे चोरी करणाऱ्या टोळीने हैदोस घतला होता. काही केल्या ही टोळी हाताला लागत नव्हती. मात्र या टोळीला मिळालेल्या गोपनीय माहिती वरुन शिताफीने अटक करण्यात स्थानीक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. जनावरे चोरीच्या गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधीक्षक, नांदेड यांनी पोलिस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार उदय खंडेराय, पोलिस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणे चालु केले होते.





या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.21 डिसेंबर) रोजी स्थागूशा च्या पथकास गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, मलंगबाबा बिल्डींग जवळील इदगाहच्या मैदानावर खुदबेनगर, नांदेड येथे जनावर चोरी करणारे पाच ते सहा इसम त्यांच्या फोर्ड कंपनीच्या गाडीसह थांबलेले आहेत अशी माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देऊन स्थागुशा चे पथकाने मलंगबाबा बिल्डींग जवळील इदगाहच्या मैदानावर खुदबेनगर, नांदेड येथे सापळा रचुन आरोपी नामे 1) रिजवान खान इतीया खान (वय 33 वर्ष), रा.मापोली ता.भिंवडी जि. ठाणे 2) मोहमद फेरोज ऊर्फ समीर पि. मोहमद सलीम (वय 30 वर्ष), रा. टायरबोर्ड बिलालनगर, नांदेड 3) समीर ऊर्फ बच्ची कुरेशी पि.अनिस कुरेशी वय (22 वर्ष), रा. कसाईवाडा, निजामपुर जि.ठाणे 4) मोहमद शोयब मोहम शफील (वय 21 वर्ष), रा.मंडई इतवारा, नांदेड 5) मोहम्मद इक्राम ऊर्फ वाजीद पि इस्माईल (वय 26 वर्ष), रा.खुदबेनगर चौरस्ता नांदेड 6) चाँद ऊर्फ चंदु पि.जमाल शेख (वय 36 वर्ष), रा.हिलालनगर, टायरबोर्ड नांदेड यांना ताब्यात घेऊन विचारपुस केली असता, त्यांनी जनावर चोरीचे गुन्हे केल्याचे कबुली दिली असुन चोरी केलेले जनावरे इसम नामे 7) सयद सोहेल सयद फारुख (वय 38 वर्ष) रा.बळेगाव ता.उमरी 8) शेख खाजीद ऊर्फ सदो पि.शेख याशीन रा. तुराबगल्ली देगलुरनाका, नांदेड यांना विक्री केल्याचे सांगीतले आहे. नमुद आरोपीतांचे ताब्यातुन नगदी 2,40,000/- रुपये व जनावरे चोरी करण्यासाठी वापरलेली एक फोर्ड कंपनीची कार व मोबाईल असा एकुण 4,01,000/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन नमुद आरोपीतांना पोलिस ठाणे अर्धापुर गु.र.नं. 446/2023 कलम 379 भा द वि गुन्हयाचे पुढील तपासकामी अर्धापुर पोलिसांचे ताब्यात दिले आहे.



सदरची कामगिरी श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधीक्षक, नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक, नांदेड, डॅा खंडेराव धरणे, अपर पोलिस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, उदय खंडेराय, पो.नि. स्थागूशा नांदेड, पोउपनि दत्तात्रय काळे, अशिष बोराटे, पोहेकॉ गंगाधर कदम, बालाजी तेलंग, पोशि विलास कदम, गणेश धुमाळ, विठ्ठल शेळके, गजानन बयनवाड, रणधीर राजबन्सी, मोतीराम पवार, ज्वालासिंघ बावरी, धम्मा जाधव, चालक हनुमानसिंह ठाकुर, शेख कलीम स्थागुशा, नांदेड यांनी पार पाडली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!