नायलॅान मांजाविरोधात हिंगोली पोलिस ॲक्शन मोडमधे…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

काल मुंबई येथे नायलॅान मांजाने गळा चिरुन कर्तव्यावरुन घरी परतत असतांना मुंबई येथील पोलिस कर्मचाऱ्यांचा दुर्दवी म्रुत्यु झाला त्या द्रुष्टीकोनातुन पोलिस अधिक्षक हिंगोली जी.श्रीधर यांनी लगेच आदेश जारी केलेत की चिनी नायलॅान मांजा विकाल तर खबरदार…

पोलिसाकडुन चार ठिकानी छापे, ३०,०००/-रू चा नायलॉन मांजा जप्त,पोस्टे हिंगोली शहर व हिंगोली ग्रामीण येथे ०३ पतंग विक्रेत्या विरुध्द गुन्हे दाखल…





हिंगोली(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक  जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयात चिनी मांझा विक्रीवर आळा घालण्यासाठी वेगवेगळे पथके स्थापन केले आहेत. तर चिनी नायलॉन मांजा विक्री करणारे पतंग विक्रेत्याच्या दुकानावर छापा मारून गुन्हे दाखल करण्याच्या सुचना दिल्या आहेत.



त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक  विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्हयात नायलॉन मांजा विक्री संदर्भाने कार्यवाही चालु आहे. आज रोजी पोलिस स्टेशन हिंगोली ग्रामीण हददीत खटकाळी बायपास परिसरात राणी सती मंदिराजवळ इसम नामे सुर्यकिरण मदनलाल बगडीया रा. गंगानगर, हिंगोली यांनी सदर ठिकाणी नायलॉन मांजा विक्री करित आहेत अशी माहिती मिळाल्या वरून पोउपनि  विक्रम विठुबोने यांच्या पथकाने छापा मारून ४० नायलॉन मांजाचे रोल किं.अं २०,०००/- रू चा मुददेमोल जप्त करून मांजा विक्रेत्या विरूध्द पो.स्टे हिंगोली ग्रामीण येथे गुन्हा दाखल केला आहे.



तसेच पोउपनि  माधव जिव्हारे यांचे पथकाने पोलिस स्टेशन हिंगोली शहर हददीतील हरण चौक येथील इसम नामे महेश बालाराम मुदीराज यांचे दृकानात छापा मारून नायलॉन मांजाचे ०९ रोल किं. अं. ४,५००/- रू वा मुददेमाल जप्त करून सदर इसमा विरूध्द पो स्टे हिंगोली शहर येथे गुन्हा दाखल केला आहे. तसेच महाविर चौक हिंगोली येथील इसम नामे संतोष नारायण धाबे यांच्या पतंग विक्री सेंटर मध्ये छापा मारून नायलॉन मांजाचे ११ रोल किं. अं ५,५००/- रू चा मुददेमाल जप्त करून मांजा विकृत्या विरुध्द पो. स्टे हिंगोली शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच सपोनि  शिवसांब घेवारे यांचे पथकाने सावरकर नगर हिंगोली येथील साहु पतंग विक्री सेंटर येथे तसेच कळमनुरी व सिरसम येथे सुध्दा पतंग विक्री दुकानात छापे मारून नायलॉन मांजा विक्री संदर्भात झाडाझडती घेण्यात आली. तसेच सपोनि  राजेश मलपिलु यांचे पथक वसमत शहर व परिसरात नायलॉन मांजा विक्री संदर्भात पतंग विकेत्यांच्या दुकानांची झाडाझडती घेत आहेत.

हिंगोली जिल्हा पोलिस दला तर्फे हिंगोली जिल्हयातील पतंग विक्रेत्यांना अवाहन करण्यात येते की, नायलॉन मांजा बाळगु नये व विक्रीही करूनये जेनेकरून पर्यावरणास व मानवी जिवितास हानी पोहचनार नाही. जो कोनी नायलॉन मांजा बाळगतांना किंवा विक्री करतांना आढळल्यास यापुढे सुध्दा भारतीय दंड संहिता व पर्यावरण संरक्षण कायदया अन्वये गुन्हे दाखल करून कठोर कार्यवाही करण्यात येईल. सर्वानि पोलिसांनी दिलेल्या सुचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!