देशी बनावटीचे पिस्तुल व काडतुससह २ आरोपी अटकेत,अकोट शहर व SDPO पथकाची संयुक्तिक कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

देशी बनावटीचे पिस्तुलालह ०९ जिवंत काडतुस जप्त,२ आरोपींना अटक,आकोट शहर पोलिस व सहाय्यक पोलिस अधिक्षकांचे पथकाची धडक कार्यवाही…

अकोट(अकोला) प्रतिनिधी – याबबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १६.०१.२०२४ रोजी पोलिस उपनिरीक्षक राजेश डी. जवरे हे गुन्हे प्रकटीकरण पथकासह पोलिस स्टेशन अकोट शहर हददीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमी मिळाली की, दोन इसम हे अकोट ते अकोला रोडवर अकोला नाक्याचे पुलाखाली केशरी रंगाची पल्सर मोटरसायकल घेवुन उभे असुन त्यांचेजवळ देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र ) आहे.या वरून सदर इसमांजवळ जावुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचेजवळ एक खाली मॅक्झीन मिळुन आली त्यावरुन त्यांना विचारपुस केली असता त्यांनी विहीरीत टाकलेले दोन देशी बनावटीचे व ०९ जिवंत काडतुस विर एकलव्य आपतकालीन पथकाचे मदतीने पंचांसमक्ष
विहीरीतुन काढुन यातील





आरोपी नामे १)अजय तुकाराम देठे वय २७ वर्ष रा. धोबीपुरा अकोट २) प्रफुल्ल विनायक चव्हाण वय २५ वर्ष रा. अडगांव बु ता तेल्हारा जि. अकोला



यांना मोटरसायकलसह ताब्यात घेतले असुन त्यांचेवर आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक बच्चन सिंग, अपर पोलिस
अधीक्षक अभय डोंगरे, अनमोल मित्तल, सहा.पोलिस अधीक्षक/उपविभागिय पोलिस अधिकारी,अकोट पोलिस निरीक्षक तपन कोल्हे, पोलिस स्टेशन अकोट शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउपनि राजेश जवरे,नापोशि चंद्रप्रकाश सोळंके,पोशि विशाल हिवरे,मनिष कुलट,प्रेमानंद पचांग, रवि सदांशिव,सागर मोरे  व चालक पोउपनि वासुदेव धर्मे, चालक पोशि संदीप तायडे  यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!