
सराईत गुंड राष्ट्रपाल उर्फ मंत्री यास MPDA कायद्यान्वये केले स्थानबध्द…
खापरखेडा येथील सराईत गुन्हेगार राष्ट्रपाल उर्फ मंत्री मधुकर मेश्राम याला MPDA कायदयांतर्गत ०१ वर्षाकरीता केले स्थानबध्द….
खापरखेडा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
पोलिस स्टेशन खापरखेडा अंतर्गत येणाऱ्या कुचक मोहल्ला पिपळा डाक बंगला ता. सावनेर, पोस्टे खापरखेडा परीसरात राहणारा सराईत गुन्हेगार राष्ट्रपाल उर्फ मंत्री मधुकर मेश्राम, वय ३२ वर्ष हा मागील १० वर्षापासून खापरखेडा परिसरात गुंडगिरी करुन दरोडा, घरफोडी, चोरी, अवैध दारू विक्री तसेच अवैध प्राणघातक शस्त्र बाळगुन शरीराविरूद्ध व मालमत्तेविरूद्ध गुन्हे करण्याच्या सवयीचा आहे. त्याच्या असामाजिक कृत्याची माहीती पोलिसांना देणाऱ्या लोकांमध्ये तो भय निर्माण करुन दहशत पसरवित असतो. नागपूर ग्रामीण पोलिसांना त्याचेविरुध्द जेव्हा जेव्हा तक्रारी प्राप्त झाल्या त्या त्या वेळी गंभीर दखल घेवून त्याचेविरुध्द गुन्हे नोंद केले व त्याला अटक केली होते. परंतु राष्ट्रपाल उर्फ मंत्री याचे गुन्हेगारी
प्रवृत्तीमध्ये सुधारणा झाली नाही. त्याचे गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्याकरीता वेळोवेळी त्याचेवर प्रतिबंधक कार्यवाही सुध्दा केली होती. परंतु राष्ट्रपाल उर्फ मंत्री याने आपली गुन्हेगारी गतिविधी निरंतर सुरुच ठेवली. राष्ट्रपाल उर्फ मंत्री याचे कृत्य सामाजिक सुव्यवस्थेला बाधक ठरत असल्याने नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण कडुन MPDA कायदयान्वये कार्यवाही करण्यात आली. मा. जिल्हाधिकारी, नागपूर यांनी दि. १५/०१/२०२४ रोजी सराईत गुन्हेगार राष्ट्रपाल उर्फ मंत्री मधुकर मेश्राम याचे विरुध्द
स्थानबध्दता आदेश काढुन त्यास आज दिनांक १९/१२/२०२३ रोजी ०१ वर्षाकरीता स्थानबध्द केले.
सदर कार्यवाही ही नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार,अपर पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलिस स्टेशन खापरखेडा येथील ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक अनिल राऊत तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक आशिषसिंग ठाकुर, सहायक फौजदार सुरज परमार, पोलीस हवालदार निलेश बर्वे, पोलिस अंमलदार होमेश्वर वाईलकर यांनी पार पाडली.




