
कत्तलीसाठी जाणारे गोवंशाची मौदा पोलिसांनी केली सुटका,ट्रकचालक फरार…
कत्तलीसाठी जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करतांना ट्रक मौदा पोलिसांचे ताब्यात,ट्रकचालक पसार….
मौदा(नागपुर) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. १९ रोजी चे रात्री ०१.१५ वा. चे दरम्यान पोलिस स्टेशन मौदा येथील पोलिस पथक पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना आवंडी (भोवरी) शिवार येथे मुखबीरद्वारे खात्रीशीर माहिती मिळाली की,एक टाटा ट्रक क्र. एम. एच. ४० / वाय. – ०९५१ मध्ये प्राण्यांना निर्दयतेने वागणूक देत चारा पाण्याची सोय करता भंडारा येथून नागपूरकडे जनावरे नेत आहे. अशा खात्रीशीर खबरेवरून मौदा पोलिस स्टाफ यांनी आवंडी भोवरी शिवार येथे नाकाबंदी केली असता भंडारा कडून नागपूरकडे जाणारा टाटा ट्रक क्र. एम. एच. ४० / वाय-०९५१ येतांना दिसला सदर वाहनाला थांबविले असता सदर ट्रक मध्ये असलेला ड्रायव्हरने ट्रक थांबवून खाली उतरून ट्रक
सोडून अंधाराचा फायदा घेउन पळून गेला. त्याचा पोलिस स्टाफसह पाठलाग केला असता मिळून आला नाही. वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये ०१ लाल रंगाचा बैल किंमती १५,०००/- रू. २ काळया रंगाचे बैल किंमत ३०,०००/–रु., १७ पांढऱ्या रंगाचे बैल २,५५,०००/- रू असे एकूण ३,००,०००/- रू चे जनावरे ज्यांच्या मुसक्या आवळून वाहनाच्या पल्ल्याला जनावरांना हालचाल करता येणार नाही अशा पध्दतीने बांधून, त्यांना निर्दयतेने वागणुक देवून त्यांची कोणत्याही प्रकारची चारापाण्याची व्यवस्था न करता वाहनात पुरेसा श्वास घेता येणार नाही अशा प्रकारे आखूड दोरखंडाने बांधुन अवैधरित्या टाटा ट्रक क्र. एम.एच.- ४० / वाय- ०९५१ मध्ये कोंबून भरून कत्तलीकरिता घेवून जातांना मिळून आल्याने टाटा ट्रक क्र. एम. एच.- ४० / वाय- ०९५१ किंमती २०,००,०००/- रू. २० गोवंश किंमती ३,००,००० / – रू. असा एकूण २३,००,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त करून जनावरे संरक्षणार्थ व संवर्धना करिता सुकृत गौशाला खैरी पिंपळगाळ, ता. लाखणी, जि. भंडारा येथे दाखल
करण्यात आले. टाटा ट्रक क्र. एम. एच. – ४० / वाय-०९५१ च्या चालकाविरूद्ध कलम ११ (१) (घ) (ड) (च) प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६० सहकलम ९ प्राणी संरक्षण अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक नागपूर (ग्रामीण) हर्ष पोद्दार अपर पोलिस अधीक्षक डॉ. श्री. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात पोलिस स्टेशन मौदा येथील ठाणेदार पोलिस निरीक्षक पराग पोटे, पोलिस उपनिरीक्षक सचिन उरकुडे व नायक पोलिस शिपाई तुषार कुडुपले, पोलिस शिपाई शुभम ईश्वरकर, अतुल निंबारते यांनी केली.




