
खुनाचा प्रयत्न करणारा फरार आरोपीस स्थागुशा पथकाने केले जेलबंद…
अवधुतवाडी पोलिस स्टेशन हद्दीतील खुनाचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपीस,स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…..
यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १५/०१/२०२४ रोजी अवधुतवाडी पोलिस स्टेशन हद्दीत राहुल उर्फ सोनु बाळु हरिहर वय ३० वर्षे. रा. तारपुरा यवतमाळ यास प्रथमेश प्रमोद सावंत रा. शारदा चौक यवतमाळ याने जुने वादाच्या कारणावरुन चाकुने हमला करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यानप्रकरणात दिनांक १६/०१/२०२४ रोजी आरोपी प्रथमेश
प्रमोद सावंत रा. शारदा चौक यवतमाळ याचे विरुध्द अपराध क्रमांक २४/२०२४ कलम ३०७ भा.द.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. परंतु आरोपी प्रथमेश सावंत हा अटक टाळण्यासाठी फरार राहत होता.
आज दिनांक १९/०१/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाला आरोपी प्रथमेश प्रमोद सावंत वय २२ वर्षे रा. शारदा चौक यवतमाळ हा खुनाचे प्रयत्नाचे गुन्हयात फरार असलेला आरोपी वाघापुर परिसरात असल्याची गोपणीय माहिती प्राप्त झाल्याने पथकाने क्षणाचाही विलंब न करता माहिती प्रमाणे वाघापुर परिसरात जावुन शोध घेत असतांना जय विजय चौक वाघापुर यवतमाळ येथे आरोपी प्रथमेश प्रमोद सावंत वय २२ वर्षे रा.शारदा
चौक यवतमाळ हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन पुढील कारवाई कामी पोलिस स्टेशन अवधुतवाडी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही. पोलिस अधीक्षक, यवतमाळ डॉ.पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक,पियुष जगताप, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात
सपोनि विवेक देशमुख, पोलिस शिपाई बंडु डांगे, साजीद शेख, अजय डोळे, रुपेश श्रीरामे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.








