
मोशी येथील स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
मोशी येथील स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी)- मोशी परिसरात स्पा सेंटरच्या नावाने सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका महिलेची सुटका करुन स्पा मॅनेजरला अटक केली आहे. ही कारवाई (गुरुवार, दि.18) रोजी रात्री दहाच्या सुमारास केली आहे.


विशाल तानाजी माने (वय 26 वर्षे, सध्या रा. जाधववाडी पुणे, मुळ रा. मु.पो. बीदाल, ता.माण जि.सातारा) याला अटक केली आहे. तर केशव ज्ञानोबा वाघमारे (वय 38 रा. जाधववाडी, मोशी) व एका महिलेवर आयपीसी 370 (3), 34 सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस नाईक गणेश सिताराम कारोटे (वय 36 वर्षे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोशी येथील स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ग्राहक पाठवून खात्री करुन घेतली. त्यानंतर स्पा सेंटरवर छापा टाकून एका महिलेची सुटका करुन स्पा मॅनेजर विशाल माने याला अटक केली. आरोपी पीडित महिलेला पैशांचे आणि दाखवून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते. यातून मिळणाऱ्या पैशातून स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे हे करीत आहेत.



