सहाय्यक पोलिस अधिक्षक यांचे पथकाचा केळवद पोलिसांचे सहकार्याने धापोवाडा येथील जुगार अड्ड्यावर छापा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

धापेवाडा येथील बंद घरात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर सहाय्यक पोलिस अधिक्षक व केळवद पोलीसांचा छापा,एकुण १,२३,७०० /- रू. चा मुद्देमाल जप्त….

केळवद(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २२ रोजी  रोजी मौजा धापेवाडा येथे वार्ड क्र. ०४ गजानन मंदीराच्या मागे उमाशंकर बहादुरे यांचे घरात काही ईसम जुगार खेळ खेळत असल्याची माहीती  अनिल म्हस्के (भा.पो.से.) सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर  यांना मिळाल्यावरून त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक राकेश
साखरकर यांना तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय सावनेर येथील पथक पाठवुन धापेवाडा येथे आरोपी उमाशंकर बहादुरे यांचे घरी जुगारावर छापा टाकला  असता आरोपीचे बंद घरामध्ये आरोपी क्र.





१) आरोपी पवन विष्णुजी दुनेदार वय २६ वर्ष रा. वार्ड क्र. ०३ धापेवाडा



२) धनराज देवनाथ बरवड वय ४० वर्ष रा. वार्ड क्र. ०२ धापेवाडा
३) सचिन गुलाबराव सोनटक्के वय ४० वर्ष रा. सोनापार ता. कळमेश्वर



४) पुरूषोत्तम भाउरावजी ठाकरे वय ४० वर्ष रा. वार्ड क्र. ०४ धापेवाडा

५) कार्तीक भिमराव तभाने वय २८ वर्ष रा. वार्ड क्र. ०४ धापेवाडा

६) सुनिल मधुकर ढोले वय ४५ वर्ष रा. वार्ड क्र. ०३ धापेवाडा

७) निखील माधोराव पावनकर वय २९ वर्ष रा. वार्ड क्र. ०५ धापेवाडा
८) श्रीकांत वासुदेव ठाकरे वय ४५ वर्ष रा. वार्ड क्र. ०४ धापेवाडा

९) उमाशंकर वसंता बहादुरे वय ४५ वर्ष रा. वार्ड क्र. ०४ धापेवाडा

हे  ५२ तासपत्त्यांवर पैशाचे हारजीतचा जुगार खेळ खेळतांना मिळुन आल्याने त्यांचे ताब्यातुन एकुण नगदी ५३१४०/- रू. व वेगवेगळया कंपनीचे मोबाईल एकुण किंमती ७०५००/- रू. व ५२ तासपत्ते आणि एक सीलबंद तासपत्त्यांची कॅट किंमती ६० / – रू. असा एकुण १,२३,७०० /- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही  हर्ष पोद्दार (भा.पो.से.) पोलिस अधिक्षक नागपुर ग्रामीण,  संदीप पखाले अपर पोलिस अधिक्षक नागपुर ग्रामीण यांचे मार्गदर्शनात  अनिल म्हस्के (भा.पो.से.) सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर,सहायक पोलिस निरीक्षक राकेश साखरकर पो.स्टे. केळवद, सहायक फौजदार
संजय उकंडे, महिला पोलिस हवालदार संगिता कोवे, पोलिस अंमलदार नितेश पुसाम, धोंडुतात्या देवकते, महिला पोलिस अंमलदार अश्विनी वांढरे यांनी केलेली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!