घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश,चोरीस गेलेला मुद्देमाल केला जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

वसमत तालुक्यातील मौ. पळशी येथील घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश,60 हजार रू. नगदी, 01 कार किं. 2 लाख रूपये असा एकुण 2 लाख 60 हजार रूपयाचा मुददेमाल सोबतच घरफोडी करण्यासाठी वापरलेले साहीत्य केले जप्त….

हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,हिंगोली जिल्हयातील बसमत तालुका अंतर्गत मौ. पळशी यागावी दिनांक
१८/०१/२०२८ रोजी रात्रौ दरम्याण फिर्यादी सोपान बेंडे यांचे घरी अज्ञात आरोपींनी घराचे मागील चॅनल गेटचे लॉक तोडुन व घराच्या दरवाज्याचा कोडा तोडुन आत प्रवेश करून कपाटातील नगदी व सोन्या चांदीचे दागीने असा २ लाख ९५ हजार रूपयाचा मुददेमाल चोरून नेला होता. सदर प्रकरणी फिर्यादी यांचे तकारी वरून पो.स्टे. हटटा येथे गुरनं. २७ / २०२४ कलम ३८०,४५७ भादवी अन्वये गुन्हा दाखल असुन नमुद गुन्हा तात्काळ उघड करून त्यातील आरोपी अटक करणे बाबत पोलिस अधीक्षक.जी श्रीधर यांनी दिलेल्या सुचनेनुसार पोलिस निरीक्षक स्थागुशा  विकास पाटील यांचे
मार्गदर्शनात सपोनि राजेश मलपिलु आणि त्यांचे पथकाने घटनास्थळी भेट देवून तपासाची चक्रे गतीमान करून व गोपनीय बातमीदार मदतीने तपास करत अवघ्या ४ दिवसात सदरचा गुन्हा हा मौ पळशी येथील सचिन मोहन शिंदे वय २८ वर्ष हा त्याचे ईतर साथिदारां मार्फत मिळुन केल्याचे निष्पन्न करून तपास पथकाने दिनाक- २२/०१/२०२४ रोजी सापळा रचुन आरोपी नामे – सचिन मोहन शिंदे यास शिताफीने ताब्यात घेतले व विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे ईतर ०२ साथीदार विशाल चव्हाण व योगेश पवार यांचेसह मिळुन केल्याची कबुली
दिली. पोलिस पथकाने त्याचे ताब्यातुन गुन्हयात चोरी करून त्याचे वाट्याला आलेले ६०,००० रू. नगदी तसेच एक चारचाकी वाहन कार किंमत २,००,०००/-  रू. व ०२ लोखंडी रॉड असा साहीत्य जप्त करून आरोपीस पुढील तपासकामी पो.स्टे. हटटा येथे हजर केले आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक  जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, स्थागुशा पोलिस निरीक्षक  विकास पाटील यांचे मार्गदशनाखाली सहा पोलिस निरीक्षक राजेश मलपिलु, पोलिस अंमलदार गजानन पोकळे, शेख बाबर, विठठल काळे, गणेश लेकुळे, विठठल कोळेकर, तुषार ठाकरे, दिपक पाटील यांनी केली









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!