
गावठी बनावटीच्या पिस्टलसह स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात…
हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने बसमत ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) सह एका इसमास घेतले ताब्यात….
हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयात मालाविरुध्दचे गुन्हयांना आळा घालण्याचे तसेच अवैध शस्त्र विरोधात कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने, पोलिस निरीक्षक विकास पाटील, स्था.गु.शा. हिंगोली यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. शिवसांब घेवारे यांचे पथक काम करीत होते.


आज दिनांक २३/०१/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक वसमत शहर व ग्रामीण हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहिती मिळाली की, इसम नामे दिपक दुधाटे, रा. सारोळा, ता. वसमत याचे जवळ बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल असून तो सध्या त्याचे राहते घरी आहे अशी खात्रीशिर माहीती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक तात्काळ सदर ठिकाणी पोहचुन इसम नामे दिपक राजेश दुधाटे, वय २१ वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. सारोळा, ता. वसमत, जि. हिंगोली यास ताब्यात घेवुन, विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने अवैधरीत्या गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) बाळगीत असल्याचे कबुल करून, एक लोखंडी गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) बॅरल व ट्रिगरयुक्त किंमती २५,०००/- रूपयाचे काढुन दिले. नमुद इसमास गावठी पिस्टल (अग्नीशरत्र) सह ताब्यात घेवुन पो.स्टे. वसमत ग्रामीण येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यानंतर सुध्दा अवैध हत्यार बाळगणा-यांविरूध्द तिव्र मोहिम करून, कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने मागील वर्षभरात एकूण आठ गावठी कट्टे जप्त केले आहे

सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पो.नि.विकास पाटील, स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि.शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार राजु ठाकुर, नितीन गोरे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे यांनी केली


