सराईत दुचाकी चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद,७ गुन्हे केले उघड..,

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

चोरीच्या सात मोटार सायकलसह 02 आरोपी जेरबंद,स्थानिक गुन्हे शाखा,जालना ची कार्यवाही……

जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्हयात मोटार सायकल चोरी करणा-या इसमाची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक  रामेश्वर खनाळ व पथकास सुचना दिल्या होत्या.
त्यावरुन अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनाखाली  रामेश्वर खनाळ पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थागुशाचे पथक तयार करून कारवाई
करण्या बाबत मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने दिनांक 27/01/2024 रोजी पोलिस ठाणे परतुर शहरात तसेच जालना जिल्यात मोटार सायकल चोरी करणा-या ईसमाची माहीती घेऊन ईसम





गणेश काशीनाथ गायकवाड वय 24 वर्षे, रा.बांदरवाडा ता.पाथरी जि.परभणी, ह.मु. निगडी पिंपरी चिचवड, पुणे



हा वेगवेगळ्या ठिकाणावरुन मोटार सायकल चोरी करुन इसम



इम्रान इसाक पठाण, वय 37 वर्षे, रा. नागापुर ता.जि.बिड

यास विक्री करण्यासाठी आणुन देत असल्याबाबत गोपनिय माहीती मिळाले वरुन सदर दोन्ही इसमाना ताब्यात घेऊन त्यांचेकडुन पुढील वर्णनाच्या 07 मोटार सायकल

1) 50,000=00 एक काळया रंगाची होन्डा कंपनिची युनिकॉन विना नंबरची मोटार सायकल (पोलिस ठाणे परतुर गुरन 34/2024 कलम 379 भादवी ),

2) 40,000=00 एक सिल्वर रंगाची होन्डा कंपनिची शाईन विना नंबरची मोटार सायकल (पोलिस ठाणे परतुर गुरन 412/2023 कलम 379 भादवी ),

3)45,000=00 एक काळया रंगाची होन्डा कंपनिची शाईन मोटार सायकल (पोलिस ठाणे परतुर गुरन 550/2023 कलम 379 भादवी ),

4) 55,000=00 एक काळया रंगाची सिल्वर पट्टे असलेली हिरो कंपनिची स्पल्डेर मोटार सायकल जिचा चेसिंग क्र. MBLHA 10A3EHD35403 इंजिन क्र. HA10ELEHD71431 असा असलेली

5)70,000=00 एक काळया रंगाची होन्डा कंपनिची युनिकॉन मोटार सायकल (पोलिस ठाणे हासनाबाद गुरन 04/2024 कलम 379 भादवी ),

6)40,000=00 एक चॉकलेटी रंगाची होन्डा कंपनिची शाईन विना नंबरची मोटार सायकल जिचा चेसिंग क्र. ME4JC 856BM D13 0661 इंजिन क्र. JC85E-D-0319241 असा असलेली

,7)30,000=00 एक काळया रंगाची हिरो कंपनिची पॅशन प्रो. विना नंबरची मोटार सायकल (पोलिस ठाणे अंबड गुरन759/2023 कलम 379 भादवी ) असा एकुण 330,000=00

किमंतीच्या मोटार सायकल वरील आरोपी कडुन जप्त करण्यात आल्या आहेत.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक  शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनाखाली  रामेश्वर खनाळ, पोलिस निरीक्षक स्थागुशा जालना, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस शिपाई विनायक कोकणे, फुलचंद गव्हाणे, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, सचिन आर्य, सतिश श्रीवास, देविदास भोजणे, आक्रुर धांडगे, भागवत खरात, स्था.गु.शा.जालना यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!