
गंभीर गुन्हा करायच्या तयारीत असणार्यास देशी कटट्यासह स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…
उमरखेड परिसरात अग्नीशस्त्र बाळगणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…
उमरखेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ जिल्हात अवैध अग्नीशस्त्र बाळणाऱ्यांचा शोध व कारवाई तसेच अवैध धंदयाचे समूळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते.
त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी
कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या. दिनांक 13/02/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना पोलिस स्टेशन उमरखेड हददीत मौजे महागांव-उरमखेड रोड लगत संजेरी हॉटेल समोर
ताईफखान जहाँगिर खान रा. सवेरा कॉलणी ता. उमरखेड जि. यवतमाळ


हा त्यांच्याकडे अग्नीशस्त्र (गावठी बनावटी कट्टा ) बाळगुन असून तो काहीतरी गंभीर गुन्हा करण्याची शक्यता आहे. अशी गोपनिय माहीती प्राप्त झाली होती. प्राप्त माहीती नुसार पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठुन संजेरी हॉटेल समोर, एक इसम हा संशयीतरित्या उभा असल्याचे दिसल्याने त्यास ताब्यात घेवून नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव ताईफखान जहाँगिर खान वय 21 वर्षे रा. सवेरा कॉलणी ता. उमरखेड जि. यवतमाळ असे सांगितल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला देशी बनावटीची पिस्टल (कटटा) व जिवंत काडतुस मिळून आल्याने जप्त करुन ताब्यात घेतली.
सदर देशी बनावटीची पिस्टल (कटटा) कोणाकडून आणला याबाबत विचारपूस केली असता अमजद खान सरदार खान रा.
वसंतनगर पुसद ता. पुसद यांच्याकडून विकत घेतले असल्याचे सांगितले. वरुन नमुद ताईफखान जहॉगिर खान वय 21 वर्षे रा.
सवेरा कॉलणी ता. उमरखेड जि. यवतमाळ याचे कब्जातुन एक देशी बनावटीची पिस्टल (कटटा) दोन जिवंत काडतुस असा
31,000/-रु चा माल जप्त करुन आरोपी विरुध्द पो.स्टे. उमरखेड येथे भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला असुन पुढील
कार्यवाही कामी पो.स्टे. उमरखेड यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही डॉ. पवन बन्सोड, पोलिस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप, अपर पोलिस अधीक्षक, यवतमाळ, तसेच उप -विभागिय पोलिस अधिकारी, उमरखेड हनुमंतराव गायकवाड यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्था.गु.शा आधारसिंग सोनोने, सपोनि गजानन गजभारे, पोउपनिरी अमोल राठोड, चापोउपनिरी रेवन जागृत,पोहवा तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, सुनिल पंडागळे, मोहम्मद ताज, सर्व स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली



