ईगतपुरी येथे स्थागुशा पथकाने पकडला गुटखा वाहतुक करणारा कंटेनर…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

ईगतपुरी येथे अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर स्थागुशा नाशिक ग्रामीणची कारवाई…

नाशिक (ग्रामीण प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांना  मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून महाराष्ट्र राज्यात उत्पादन साठा व साठ्यांस प्रतिबंधीत असलेला सुगंधीत तंबाखु व जर्दा गुटखा कंटेनरमध्ये सोयाबीन वडींच्या गोण्यांच्यामागे लपवून, चोरटया रितीने वाहतुक करणाऱ्यांना शिताफीने अटक करून त्यांच्याकडून एकूण ४६ लाख २३ हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे.





या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.१४फेब्रुवारी) रोजी ०१.१५ वा चे दरम्यान पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण पोशि. मनोज शांताराम सानप, स्थागुशा यांना इगतपुरी पोलिस ठाणे हद्दीत, आग्रा मुंबई महामार्ग क्र. ३, घोटी टोल नाक्याच्या पुढे, हॉटेल अँड परीवार समोर इसम नामे



१) अमृत भगवान सिंह, (वय ४२ वर्षे), रा. वडवेली, पो.हिनौतीया ता.खिलचीपुर, जि.राजगड, राज्य मध्यप्रदेश व त्याचा साथीदार



२) पुनमचंद होबा चौहाण, (वय ५१ वर्षे), रा.सकारगाव, ता.बिकनगाव, जि.खरगोन राज्य मध्यप्रदेश

यांनी आपसात संगणमत करून आयशर कंटेनर नंबर DD 01-F -9102 या कंटेनरमध्ये महाराष्ट्र राज्यात  उत्पादन साठा व साठ्यांस प्रतिबंधीत असलेला सुगंधीत तंबाखु व जर्दा गुटखा कंटेनरमध्ये सोयाबीन वडींच्या गोण्यांच्यामागे लपवून, चोरटया रितीने वाहतुक करीत असतांना मिळुन आले, असून सदर इसमांकडून खालील प्रमाणे मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे.

१) २१,०२,४००/- रु. किंमतीचा SHK नावाचा सुगंधीत गुटखा असलेल्या ४० पिवळया रंगाच्या मोठ्या गोण्या, प्रत्येकी गोणीची किंमत ५२५६० किंमतीच्या, त्यात प्रत्येकी गोणीत सफेद रंगाच्या लहान ६ गोण्या, प्रत्येक सफेद रंगाच्या लहान गोणीमध्ये ६० प्लॅस्टीकचे लाल हिरव्या रंगाचे पॅकेट त्यावर SHK असे इंग्रजीत प्रिंटेड असलेले, त्यामध्ये २ रूपये किंमतीच्या ७३ लहान पुडया किं.अं.

२) २५,००,०००/- रु. किंमतीचा आयशर मोटर कंपनीचा सहा चाकी कंटेनर

३) १,०००/- एक मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल जु.वा., कि.अं.

४) १०,०००/- एक ओप्पो कंपनीचा स्क्रीनटच मोबाईल फोन

५) १०,०००/- रू. एक विवो कंपनीचा मोबाईल फोन

असा एकूण ४६,२३,४०० /- रू. मुद्देमाल हा जप्त केला आहे.

आरोपी नामे १) अमृत भगवान सिंह, (वय ४२ वर्षे), रा. वडवेळी पो.हिनौतीया, ता.खिलचीपुर, जि.राजगड, राज्य मध्यप्रदेश व त्याचा साथीदार २) पुनमचंद होबा चौहाण, (वय ५१ वर्षे), रा.सकारगाव, ता.बिकनगाव, जि.खरगोन, राज्य मध्यप्रदेश यांच्या विरूध्द भादवि कलम ३२८,२७२,२७३,१८८,३४ प्रमाणे ईगतपूरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरची कार्यवाही विक्रम देशमाने पोलिस अधिक्षक नाशिक ग्रामीण, आदित्य मिरखेलकर पोलिस अधिक्षक नाशिक,अनिकेत भारती अपर पोलिस अधिक्षक ,मालेगाव,तेगबिरसिंग संधु उपविभागिय पोलिस अधिकारी,मालेगाव यांचे मार्गदर्शनाखाली राजु सुर्वे पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,पोलिस उपनिरीक्षक दत्ता कांभीरे,पोशि मनोज सानप यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!