
मुंबई -आग्रा महामार्गावर जबरी चोरी करणारे नाशिक पोलिसांचे ताब्यात…
मुंबई-आग्रा महामार्गावर रात्रीच्या वेळी प्रवासी वाहनांवर कोयत्याने हल्ला करून लुटमार करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद- स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…..
नाशिक(ग्रामीण प्रतिनिधी) – दि. ०१ जानेवारी २०२४ रोजी मध्यरात्रीचे सुमारास घोटी पोलिस ठाणे हद्दीत मुंबई आग्रा
महामार्गावर मुंढेगाव शिवारात फिर्यादी किरण कावळे, रा. दिवा ईस्ट, ठाणे हे त्यांचे मित्रांसोबत होन्डा सिटी कारमध्ये नाशिक बाजूकडे रस्त्यावर रात्रीच्या वेळी विश्रांतीसाठी थांबलेले असतांना मोटर सायकलवर आलेल्या अज्ञात तीन आरोपींनी त्यांचे कारची पुढील काच फोडून, लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करून त्यांचेकडील सोन्याच्या चैन, मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण ७०,५७०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जबरीने लुटमार करून नेला होता.


सदर घटनेबाबत घोटी पोलीस ठाणे येथे गुरनं ०१ / २०२४ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच सदर घटनेनंतर १३ जानेवारी २०२४ रोजी देखील अशाप्रकारे तीन आरोपींनी मोपेड मोटर सायकलवर येवून फिर्यादी नवीनकुमार जैन, रा. दादर, मुंबई यांचे टाटा हॅरिअर कारच्या काचा फोडून, कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करून रोख रक्कम व मोबाईल फोन असा ८२,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जबरीने लुटमार करून नेल्याबाबत वाडीव-हे पोलीस ठाणे गुरनं १३/२०२४ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल होता.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व अनिकेत भारती यांनी जिल्हयातील पोलिस ठाणेनिहाय नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून गुन्हे उघडकीस आणणेसाठी पोलिस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास सूचना दिल्या होत्या. त्यानूसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे यांचे पथकाने वरील गुन्हयातील
आरोपीतांची गुन्हा करण्याची पध्दत व त्यांनी गुन्हयात वापरलेल्या मोटर सायकल यावरून तपासाची चक्रे फिरवून गुन्हेगार हे नाशिक शहरातीलच असल्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे पोलिस पथकाने नाशिक शहरातील नानावली, व्दारका तसेच उपनगर परिसरात सतत पाळत ठेवून सराईत गुन्हेगार नामे

१)तौसिफ लुकमान पठाण उर्फ गफुर बस्ती, वय ३०, रा. घर नं. ३८८२, नानावली, मानुर रोड, नाशिक,
२) प्रविण उर्फ चाफा निंबाजी काळे, वय २४, रा. आम्रपाली झोपडपट्टी, कॅनॉल रोड, उपनगर, नाशिक
यांना शिताफीने ताब्यात घेतले. सदर आरोपींना विश्वासात घेवून वरील गुन्हयांबाबत विचारपूस केली असता, त्यांनी त्यांचा साथीदार नामे

३) मोहम्मद अन्वर सैय्यद, रा. स्वामी समर्थ हौसिंग सोसायटी,
नानावली, प्रज्ञानगर नाशिक
याचेसह मागील महिन्यात मोटर सायकलवर मुंबई आग्रा महामार्गाने घोटी व वाडीव-हे परिसरात जावून रस्त्यावर थांबलेल्या वाहनांमधील प्रवाशांना कोयत्याचा धाक दाखवून गाडीच्या काचा फोडून मारहाण करून जबरीने लुटमार केल्याची कबुली दिली आहे.
यातील ताब्यात घेतलेले आरोपी तौसिफ पठाण व प्रविण काळे यांचे कब्जातून वरील गुन्हयांमध्ये जबरीने चोरून नेलेले तसेच कब्जात मिळून आलेले व्हीवो, ओपो, रिअलमी, रेडमी, अॅपल, टेक्नो
कपंनीचे ०९ मोबाईल फोन, तसेच गुन्हयात वापरलेली निळ्या रंगाची होन्डा अॅक्टीव्हा मोटर सायकल, तसेच पिवळ्या धातूची चैन असा एकुण ९७,००० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयातील आरोपी नामे मोहम्मद अन्दर सैय्यद हा भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीत अग्निशस्त्रे बाळगल्याचे गुन्हयामध्ये मध्यवर्ती कारागृह, नाशिकरोड येथे न्यायालयीन कोठडीत आहे. यातील सर्व आरोपी हे नाशिक शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांचेवर यापुर्वी जबरी चोरी, चोरी, दुखापत, आर्म अॅक्ट असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. वरील गुन्हयांचे तपासात सदर आरोपीतांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक. विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस
निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि गणेश शिंदे, पोहवा नवनाथ सानप, नापोशि विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, मनोज सानप, चापोना भुषण रानडे यांनी केली


