
लोणी हद्दीतील कुख्यात गुंड सुमीत उमाळे याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…
iलोणी पोलिस स्टेशन हद्दीतील कुख्यात धोकादायक इसम सुमीत उमाळे यास MPDA कायद्यान्वये केले स्थानबद्ध….
लोणी(अमरावती)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन लोणी हद्दीतील कुख्यात धोकादायक इसम सुमित सुनिल उमाळे, वय २२ वर्ष, रा. ग्राम लोणी टाकळी, विठ्ठल रुख्माई प्लॉट, ता. नांदगांव खंडे. जि अमरावती हा पोलिसांचे कारवाईला न जुमानता स्वतः तसेच साथीदारांसह मालमत्ताविरुद्धचे दखलपात्र स्वरुपाचे गंभीर गुन्हे जसे की, चोरी, सशस्त्र जबरी चोरी, नागरिकांनी प्रतिकार केल्यास त्यांना जिवे मारण्याची धमकी देणे, सशस्त्र दहशत पसरविणे, नागरिकांना गैरनिरोध करणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे यासारखे गुन्हे करण्यामध्ये गुंतलेला होता. त्याने अमरावती जिल्हयामध्ये गुंडप्रवृत्तीचा इसम म्हणुन ओळख निर्माण करुन नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. त्याचेमुळे सार्वजनिक व वैयक्तिक
मालमत्तेस व जिवितास मोठया प्रमाणात बाधा निर्माण होवुन लोकांचे मनात असुरक्षिततेची व भितीची भावना निर्माण झाली होती. नमुद इसमाविरुद्ध उघड उघड तक्रार देण्यास कोणीही धजावत नव्हते. त्याचेवर वेळोवेळी करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईचा त्याचे वर्तणुकीवर काहीएक परिणाम झाल्याचे दिसुन येत नव्हते.
करीता परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व कुख्यात धोकादायक इसमाचे गुन्हेगारी वृत्तीस आळा
घालण्यासाठी पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रामीण यांनी त्यास एमपीडिए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी, अमरावती यांचेकडे सादर केला होता.
मा. श्री. सौरभ कटियार, जिल्हादंडाधिकारी, अमरावती यांनी सर्व कायदेशिर बाबींची पडताळणी करुन तसेच नमुद इसम हा कुख्यात धोकादायक इसम असल्याची स्वतःचे स्त्रोतामार्फत खात्री करुन त्यास अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध ठेवण्याबाबतचा आदेश दिनांक १५/०२/२०२४ रोजी पारित केला आहे. मा. जिल्हादंडाधिकारी, अमरावती यांचे आदेशास अनुसरुन कुख्यात धोकादायक इसम सुमित सुनिल उमाळे, वय २२ वर्ष, रा. ग्राम लोणी टाकळी, विठ्ठल रुख्माई प्लॉट, ता. नांदगांव खंडे. जि अमरावती यास सदरचा आदेश तामील करुन जिल्हा मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक विशाल आनंद (भा.पो.से.), अपर पोलिस अधिक्षक,पंकज कुमावत (भा.पो.से.) यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांचे नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक सागर हटवार, पोहवा अमोल देशमुख तसेच पोलिस स्टेशन लोणी येथील ठाणेदार
सपोनि मिलींदकुमार दवणे यांनी पार पाडली. अमरावती ग्रामीण जिल्हयात सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहुन शांतता राहावी याकरीता अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारे व पोलिसांचे कारवाईस न जुमानता दहशत पसरविणारे गुंड / सराईत गुन्हेगारांची माहिती संकलीत करण्यात येत असुन त्यांचेवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे.




