
चेतन ठमके खुन प्रकरणातील फरार असलेले आरोपी युनीट १ च्या तावडीत सापडले…
चेतन ठमके खुन प्रकरणातील फरार आरोपीस गुन्हेशाखा युनिट १ ने केले जेरबंद….
एकलहरे रोडवरील अज्ञात व्यक्तीच्या खुनाचा उलगडा करण्यात युनीट १ ला यश…

नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, चेतन ठमके खुन प्रकरणात नाशिक रोड पोलिस ठाणे येथे गुरनं ९१ / २०२४ भादवि कलम ३०२ सह भा. ह. का कलम ४/२५ व म.पो.का कलम १३५ प्रमाणे दि. १८/०२/२०२४ रोजी दाखल आहे.
दि.२०.०२.२०२४ सदर गुन्हयातील इतर फरार आरोपींचा शोध घेणेबाबत प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, गुन्हेशाखा, डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक
शहर यांनी गुन्हेशाखा युनिट १ यांना मार्गदर्शन केले होते.
त्याअनुषंगाने गुन्हेशाखा युनिट १ चे पोलिस अधिकारी व अंमलदार पाहिजे असलेला फरार आरोपींचा शोध घेत असतांना पोहवा विशाल काठे यांना गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी प्रफुल्ल पाटील हा दारणा सांगवी ता. निफाड जि. नाशिक येथे फिरत आहे. सदरची माहिती वरीष्ठ पोलिस निरिक्षक अनिल शिंदे व पोलिस निरिक्षक विजय पगारे यांना देवुन त्यांनी सपोनि हेमंत तोडकर, रविंद्र बागुल, पोहवा प्रविण
वाघमारे, संदिप भांड, विशाल काठे, नाझीम पठाण,नापोशि विशाल देवरे, चापोशि समाधान पवार अशांचे पथक तयार करून रवाना केले.
सदर पथकाने मिळालेल्या बातमीवरून प्रफुल्ल उर्फ सोनु विजय पाटील वय २१ वर्ष, रा. रूम नं. १९, अश्विनी कॉलनी, सामनगाव रोड, नाशिक यास सापळा लावुन दारणा सांगवी ता. निफाड, जि. नाशिक येथे पकडुन ताब्यात घेतले व त्यास गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली आहे. सदर पाहिजे असलेला फरार आरोपीस पुढील कारवाई कामी नाशिकरोड
पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,प्रशांत बच्छाव,
पोलिस उपायुक्त, गुन्हेशाखा, डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, पोनि विजय पगारे, सपोनि हेमंत तोडकर, पोउपनि चेतन श्रीवंत, विष्णु
उगले, सपोनि रविंद्र बागुल, पोहवा प्रविण वाघमारे, संदिप भांड, विशाल काठे, नाझीम पठाण, धनंजय शिंदे, नापोशि विशाल देवरे, प्रशांत मरकड, पोशि समाधान पवार, विलास चारोस्कर,अमोल कोष्टी, नितीन जगताप, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, मुक्तार शेख, मपोशि अनुजा येलवे केलेली आहे.



