शेतात अंमली पदार्थ अफुची लागवड करणाऱ्यावर पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कार्यवाही….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

विनापरवाना अवैधरित्या अंमली पदार्थ अफुची शेती करणारे दोघेजण घेतले ताब्यात ३५.२८ किलोग्रॅम वजनाचा व ७६,५६०/- किंमतीचा मुद्देमाल केला जप्त, पुणे ग्रामीण पोलीसांची कारवाई…..

जेजुरीपुणे(ग्रामीण)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
अंमली पदार्थ ही एक मोठी सामाजिक समस्या असल्याने पुणे ग्रामीण जिल्ह्याचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक, पंकज देशमुख  यांनी पदभार स्विकारल्यापासून अंमली पदार्थांचे उत्पादन, साठा, विक्री, सेवन करणारे इसमांवर तसेच कायद्याचा भंग करून शेतीचे नावाखाली शेती मालात अफु, गांजा सारख्या अंमली पदार्थ
निर्मिती करणाऱ्या वनस्पतींची बेकायदेशीरपणे विनारपरवाना लागवड करून उत्पादन घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलिसांना दिले आहेत





त्याअनुषंगाने दि. २९/०२/२०२४ रोजी जेजुरी पोलिस स्टेशनचे पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,मौजे मावडी क.प., ता. पुरंदर जि पुणे गावातील इसम  किरण कुंडलीक जगताप व रोहीदास चांगदेव जगताप यांनी त्यांचे शेतात विनापरवाना बेकायदेशीरपणे अफुची लागवड करून उत्पादन घेतले आहे. अशा मिळालेल्या गोपनिय बातमीच्या अनुषंगाने जेजुरी पोलिस स्टेशन व भोर पोलिस स्टेशनकडील अधिकारी व स्टाफ
यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांचे आदेशाने सदर ठिकाणी जावून मौजे मावडी क.प. गावातील जगताप मळ्यातील कवठीचा मळा येथे गेले. कवठीचा मळा येथील दोन वेगवेगळ्या शेतात जावून पाहणी करून
पाहनी केली असता, शेतामध्ये उपस्थित इसम किरण कुंडलीक जगताप, वय ४० वर्षे, व रोहीदास चांगदेव जगताप वय ५५ वर्षे, दोघे रा. कोडीत बु ता. पुरंदर, जि. पुणे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी शेतांमध्ये अफुची बेकायदेशीर विनापरवाना लागवड केल्याचे आढळून आले, अफुची लागवड केलेली दिसून येवू नये याकरीता शेतात कांदा व लसून पिकाची लागवड करणेत आलेली होती. सदर ठिकाणी ३८.२८ किलो ग्रॅम वजनाची अफुची झाडे बोंडांसह किं. रु. ७६,५६०/- ची जप्त करणेत आलेली आहेत.



सदर दोन्ही इसमांविरोधात जेजूरी पोलिस स्टेशन येथे गु.र.नं. ८५ / २०२४ एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ ब, १८ क, प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आलेला आहे. चालु आठवड्यात पाच दिवसांपुर्वी कोडीत बुा ता. पुरंदर जि. पुणे गावात स्थानिक गुन्हे शाखेने विनापरवाना अफुची बेकायदेशीर विनापरवाना लागवड करून उत्पादन घेणारे दोन इसमांवर कारवाई केलेली आहे. अफुची शेती करणेसाठी परवाना आवश्यक असून नागरीकांनी कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर विनापरवाना अफुची अगर गांजाची शेती केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करणेत येणार असल्याचा इशारा पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी दिला आहे.



सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अपर पोलिस अधीक्षक. संजय जाधव, बारामती विभाग, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत पांडुळे, भोर विभाग, सासवड यांचे मार्गदर्शनाखाली भोर पोलिस स्टेशनचे पोलिस आण्णासाहेब पवार, जेजूरी पोलिस स्टेशनचे स.पो.नि. दिपक
वाकचौरे, पोउपनि महेश पाटील, नामदेव तारडे, पोलिस अंमलदार विठ्ठल कदम, शुभम भोसले, तात्यासाहेब खाडे, दशरथ बनसोडे, भानुदास सरक यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास जेजूरी पोलिस स्टेशन करत





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!