खंडनीखोरांचे तावडीतुन अवघे ४ तासात अपह्रुत ईसमाची सुटका…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

खंडनीखोराच्या ताब्यातुन इसमाची  ४ तासात सुटका,पाठलाग करुन तीन आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…,

हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आज दि. ११/०३/२०२४ रोजी पहाटे ४ वाजनेचे सुमारास पो.स्टे. हिंगोली ग्रामीन येथे फिर्यादी नामे प्रमोद शेषराव पांडे वय २५ रा. डिग्रस कन्हाळे यांने माहिती दिली की त्याच भाउ नामे विनोद शेषराव पांडे वय ३५ वर्ष व्य. चालक याचे कुनीतरी अज्ञात लोकांनी अपहरन केले असुन त्याला सुखरुप सोडन्यासाठी दहा लाखाची खंडनी मागत आहेत अन्यथा भावाला जिवे मारतो असे मोबाईल द्वारे सांगत आहेत अशा प्रकारची माहिती प्राप्त झाले वरुन पोलिस अधीक्षक  जी. श्रीधर यांनी सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन सदर खंडनीखोर आरोपीस पकडुन त्यांच्या ताब्यातील इसमाची सुखरुप सुटका करन्यासंदर्भात स्थागुशा पोलिस निरीक्षक विकास पाटील व हिंगोली ग्रामीनचे ठानेदार विजय रामोड यांना दिल्या.





पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी सुचना दिल्या वरुन आरोपीस पकडनेसाठी सपोनि रामोड, स्थागुशाचे सपोनि घेवारे, पोउपनि विठुबोने यांचे पथक फिर्यादीस घेवुन व नकली १० लाखाची बॅग घेवुन दाटेगाव लोहगाव परीसरात गेले असता खंडनीखोरानी वेळोवेळी लोकेशन बदलत राहीले. पोलिस पथक दाटेगाव व लोहगाव शेत शिवारात शोधले  परंतु आरोपी सापडत नव्हते. शेवटी आरोपीनी केशव माळ या टेकडीवर दहा लाख रुपयाची बॅग ठेवन्याचे सांगीतले त्यावरुन पोलिस पथकाने शेतकऱ्याच्या वेशात फिर्यादीचा भाऊ सोबत नेवुन डमी पैशाची बॅग केशव माळ परीसरात ठेवून बाजुला झाडा झुडपात बसले असता आरोपीने थोड्यावेळाने सदर पैशाची बॅग नेण्यासाठी जवळ येताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करून एका आरोपीस पकडले असता त्याने त्याचे नाव गाव १) ओमकार उर्फ शुटर केशव मुखमाहाले वय २० वर्ष व्य. मजूरी रा. डिग्रस क-हाळे असे सांगीतले. व त्याचे सोबत असलेले इतर साथीदार आरोपी नामे २) हनुमान उर्फ हंन्टर विश्वनाथ क-हाळे वय २५ वर्ष, ३) नितीन उर्फ जादु रामेश्वर क-हाळे वय १९ वर्ष सर्व रा. डिग्रस क-हाळे यांनी मिळून हनुमान उर्फ हंन्टर याचे मैत्रीनीला विनोद शेषराव पांडे हा बोलत असल्याचे कारणावरून डिग्रस क-हाळे गावातून विनोद पांडे यास केशवमाळावर घेवून जावून जिवंत सोडण्यासाठी १० लाख रूपयाची खंडणी मागीतल्याचे सांगुन इतर दोन साथीदार आरोपी व ताब्यातील विनोद पांडे हा केशवमाळावर असल्याचे सांगीतले यावरुन पोलिस पथकांने केशव माळावर जावून इतर दोन आरोपीवा ०५ किमी पाठलाग करून आरोपीचे ताब्यातील घातक हत्यारासह (खंजीर) पकडले व इसम विनोद पांडे यास सुखरूप सुटका केली. सदर ताब्यातील आरोपी यांचेवर अनेक गुन्हे दाखल असून रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत.



सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, स्थागुशा पोलिस निरीक्षक  विकास पाटील यांचे मार्गदशनाखाली सपोनि विजय रामोड , स्थागुशाचे सहा. पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, सपोनि राजेश मलपिलु, पोउपनि विक्रम विठुबोने, पोलिस शिपाई किशोर सावंत, महादु शिंदे, विशाल खंडागळे, गजानन पोकळे, विठठल काळे, राजु ठाकुर, नितीन गोरे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, आझम प्यारेवाले, दिपक पाटील व पोस्टे हिंगोली ग्रामीणचे पोउपनि मगन पवार, असलम गारवे, होमगार्ड विशाल मोहीते, कोरडे यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!