
अवैध जुगार अड्ड्यावर युनीट १ चा छापा,१६ जुगारीसह १६ लक्ष रु किंमतीचा मुद्देमाल जप्त…
अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या ईसमांवर गुन्हे शाखा युनीट १ चा छापा, एकुण १६,३०,३३०/–रू. चा मुद्देमाल केला जप्त…
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २१.०४.२०२४ चे संध्या ६.४५ वा. चे सुमारास, गुन्हेशाखा युनिट १ चे अधिकारी व अंमलदार हे शहर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना गोपनीय खात्रीशीर माहीती मिळाली कि पोलिस ठाणे हिंगणा हद्दीत रमेश नारायण भोपे यांचे झिल्पी(रिठी), मौजा मोहगाव, झिल्पी येथील शेतातील फार्म हाऊस समोर, मोकळया शेडखाली काही ईसम अवैधरित्या जुगार खेळताय


अशा माहीतीवरुन सदर ठिकाणी खेळणाऱ्या ईसमांवर छापा कार्यवाही केली असता, त्या ठिकाणी ईसम नामे १) प्रल्हाद गंगाराम रामटेके, वय ४९, रा.बाळाभाऊ पेठ, नागपूर, २) मोजेस राजेन्द्र अंवीकर, वय ३८ वर्षे, रा. इंदोरा, नागपूर ३) कार्तिक मधुकर निनावे, वय ३५ वर्षे, रा. गोळीबार चौक, ४) पुरूषोत्तम रामचंद्र हिंगणेकर, वय ४२ वर्षे, रा. लालगंज, ५) रंजित प्राण किस्टो सादरा, वय ४० वर्षे, रा. चंदन नगर, नागपूर ६) कार्तिक छगन उरकुडे, वय २८ वर्षे, रा. नंदनवन, ७) राकेश श्रावणजी नक्षने, वय ३६ वर्षे, रा. धनवंतरी नगर, ८) अजय दुर्गाप्रसाद शाहु, वय ३० वर्षे, रा. मानेवाडा, ९) सचिन
जयसिंग नाडे, वय २३ वर्षे, रा. टोली, १०) अश्विन रामकृष्ण सडमाके, वय २८ वर्षे, रा. राणी दुर्गावती चौक, ११) संजय दामोदर पराडकर, वय ४० वर्षे, रा. शहाणे ले-आउट, प्रतापनगर १२) चंदु अशोक निनावे, वय ३५ वर्षे, रा.पाचपावली १३) कृष्णा शंकरराव पिंपळे, वय ४६ वर्षे, रा. दाते ले-आउट, १४ ) दिलीप बिठोबाजी धकाते, वय ४६
वर्षे, रा. पाचपावली, १५) प्रणय निरंजन चौधरी, वय २९ वर्षे, रा. गोपाल नगर, १६) रमेश नारायण भोपे, वय ६० वर्षे, रा. मोहगाव, झिल्पी, हे सर्वजण ताश पत्यावर पैशाची बाजी लावुन हार – जितचा जुगार खेळताना समक्ष मिळुन आले.

आरोपींचे ताब्यातुन ताश पत्ते, वेगवेगळ्या कंपनीचे १६ मोबाईल फोन, ०६ दुचाकी मोटारसायकल, वेगवेगळ्या कंपनीच्या ०२ चारचाकी वाहन व नगदी २७,८४० /- रू असा एकुण १६,३०,३३० /- रू. चा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली.

सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त डॅा रविंद्र सिंघल,सह पोलिस आयुक्त अश्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त(गुन्हे)संजय पाटील,पोलिस उपायुक्त डिटेक्शन निमीत गोयल,सहा.पोलिस आयुक्त अभिजित पाटील यांचे आदेशानुसार पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा युनीट १ सुहास चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन भोंडे,पोहवा बबन राऊत,विनोद देशमुख,नापोशि सुशांत सोळंखे,मनोज टेकाम,शरद चांभारे,रवी राऊत यांनी केली


