
बोगस बियाने विक्री करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
वडकी पोलिस स्टेशन हद्दीतुन शासनाने प्रतिबंधीत केलेले कपाशी बियाने व इतर साहित्य असा एकुण ८,१५,०००/- रु चा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त करुन चार आरोपींना घेतले ताब्यात….
वडकी(यवतमाळ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२९) रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक प्रलंबित गुन्हे उघडकीस आणने व पाहिजे फरार आरोपींचा शोध घेणे साठी पोलिस स्टेशन . वडकी हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय बातमीदारकडुन खात्रीलायक माहिती मिळाली की, एक ईसम हे भारत सरकारने प्रतिबंधित अशा कपाशीचे बियाने विक्री करीता येणार आहे अशा खात्रीशीर माहीतीवरुन वरीष्ठांना माहीती देऊन सोबत क्रुषी विभागाचे अधिकाऱ्यांना सोबत घेऊन खैरी बसस्थानक परीसरात सापळा लावुन बसले असता माहीती मिळाल्याप्रमाणे एक लाल रंगाची सुझुकी ब्रिझा वाहन क्र. एम.एच.४१ ए ई- ६१९६ गाडी येतांना दिसली तिला थांबवुन त्यातील ईसमांनी त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) विलास नानाजी देवेवार २) अविनाश संतोषराव निकम दोन्ही रा. सावित्री पिंपरी, वडकी,असे सांगितले त्यांचे वाहनाची झडती सोबत असलेले कृषी अधिकारी यांनी घेतली असता वाहनाचे मागील सिट समोरील मोकळया जागेत एका प्लास्टीक पोत्यात अंदाजे ३३ किलो खुले कपाशी बियाने किमंत अंदाजे १,०५,००० रु चे आढळुन आले


त्यांना सदरचे बियाने कोठुन आणले याबाबत विचारपुस केली असता त्यांनी ते बियाने ३) सागर अरुन पारलेवार रा. कोठारी ता.
बल्लारशा जि. चंद्रपुर यांचेकडुन विक्री करीता आणले असल्याचे सांगीतले आहे. नमुद इसमांकडे अनाधिकृत कपाशी बियाने विक्री
करीता बाळगुन असलेले मिळुन आल्याने सदरचे बियाने व नमुद इसमांचे ताब्यात असलेले वाहन तसेच त्याचे कडील मोबाईल फोन
असा एकुण ८,१५,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन पो.स्टे. वडकी येथे तिनही इसमाविरुध्द गुन्हा नोंद करणात आला आहे.

त्याच प्रमाणे दिनांक २७/०५/२०२४ रोजी पो.स्टे. शिरपुर हद्दीत कृषी विभागाचे अधिकारी यांना सोबत घेवुन केलेल्या दुसर्या
कारवाई मध्ये आरोपी अमोल विजय चिकनकर वय ३३ वर्षे, रा. वार्ड नं. ०२ भाल ता. वणी जि. यवतमाळ ह.मु. पिंपरी कायर ता. वणी याचे कब्जातुन बलवान रिसर्च हर्याब्रिड कॉटन सिड ५ जी या अनाधिकृत कपाशी बियान्याचे १५ पाकीटे किमंत १८,०००/- रु चे
जप्त करुन पो.स्टे. शिरपुर येथे त्याचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक, पियुष जगताप,पोलिस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात सपोनि अमोल मुडे, पोउपनि रामेश्वर कांडुरे, पोलीस अंमलदार योगेश डगवार, सुधिर पांडे, सुनिल खंडागळे, निलेश निमकर, सुधिर पिदुरकर, रजनिकांत मडावी सर्व स्थागुशा यवतमाळ तसेच श्री राजेन्द्र माळोदे, श्री. अमोल जोशी, श्री. प्रविण जाधव, श्री. कल्याण पाटील सर्व कृषी विभाग यांनी पार पाडली.


