अवैध अग्नीशस्त्रासह खापरखेडा येथुन एकास घेतले ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…

नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१३) रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोस्टे खापरखेडा परीसरात पेट्रोलींग करीत असता गोपनीय खबर मिळाली की, चनकापूर येथे राहणारा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार आशिष उर्फ गुल्लु राजबहादुर
वर्मा रा. चनकापुर, खापरखेडा हा मिलन चौक खापरखेडा येथे माऊजर सह येणार आहे.





अशा गोपनीय माहितीवरून पथकाने सदर ठिकाणी संध्या ६.४५ वाजता सुमारास सापळा रचून त्यास ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता त्याचे अंगझडतीत त्याचे कमरेला एक देशी बनावटीचे लोखंडी माऊजर किंमती २५,००० /- रू. आणि मॅगझिन मध्ये ०२ जिवंत काडतूस किंमती २०००/- रू. असा एकूण २७०००/- रू. चा मुद्देमाल मिळुन आला. त्यास सदरचे अग्निशस्त्र कुठून आणले याबाबत विचारणा केली असता सन २०१७ मध्ये लखनसिंग सरदार रा. खरगोन, मध्यप्रदेश याने साहुली येथे आणून दिल्याचे सांगितले. दोन्ही आरोपी इसमाविरुद्ध पो.स्टे. खापरखेडा अप. क्र. ३२३/२४ कलम ३, २५ भारतीय शस्त्र अधि. अन्वये गुन्हा नोंद करून पुढील कार्यवाहिकामी पो.स्टे. खापरखेडा यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधीक्षक  हर्ष ए. पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सपोनि किशोर शेरकी, पो.हवा. रोशन काळे,आशिष मुंगळे,नितेश पिपरोदे,शंकर मडावी,उमेश फुलबेल,नापोशी विरेंद्र नरड, विपीन गायधने, चापोहवा अमोल कुथे यांनी पार पाडली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!