विद्युत रोहीत्र(ट्रान्सफार्मर)चोरणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात…

पुणे ग्रामीण (प्रतिनिधी) – पुणे ग्रामीण पोलिसांनी विद्युत रोहीत्र (ट्रान्सफॉर्मर) चोरी करणारी टोळी जेरबंद करून ४८ गुन्हे उघडकीस आणून ५०० किलो ग्रॅम तांब्याच्या पट्टया व तारांसह गुन्हयात वापरलेली वाहने असा एकूण रू.१४ लाख ५० हजार रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. गुन्हे शाखा पुणे ग्रामीण जिल्हयातील शिरूर, दौंड उपविभागात मागील महिन्यात विद्युत रोहीत्र (ट्रान्सफॉर्मर) चोरीचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विद्युत रोहीत्र चोरी गेल्याने परीसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असे, तसेच परीसरात अंधार राहत असल्याने इतर चोरीच्या शक्यता वाढत होत्या.





या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विद्युत रोहीत्र हे दुर्गम भागात असल्याने चोरी झाल्या नंतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सीसीटीव्ही याद्वारे तपास होणे अडचणीचे होते. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी सदर गुन्हयाचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेवून गुन्हे घडलेली ठिकाणे, गुन्हयांची वेळ, गुन्हयांची कार्यपद्धती याचा आढावा घेऊन योग्य ते मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना केल्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची तीन तपास पथके तयार करणेत आली होती. तपास पथकांनी शिरूर पोलीसांचे मदतीने गुन्हयांचे घटनास्थळे पडताळून घटनास्थळा कडे येणारे जाणारे रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेची तपास पथकांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासून त्यांच्या सध्याच्या हालचालींवर लक्ष केंद्रीत करून तपास चालू केला. सदरचे गुन्हे हे रेकॉर्डवरील आरोपींनी केले असल्याचे गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाल्याने संशयित आरोपींना ताब्यात घेण्याचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची तीन तपास पथके रवाना करणेत आली. विद्युत रोहीत्र चोरणारी टोळी ही तळेगाव ढमढेरे परीसरात असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास पथकांनी सापळा रचून आरोपी नामे १) विशाल खंडू पवार (वय-२५ वर्षे) यंदा जेसीबी चालक रा.तांबेवाडी वडगाव सावताळ, ता.पारनेर, जि.अहमदनगर २) प्रदीप राजेंद्र शिंदे (वय २६ वर्षे) धंदा. ड्रायव्हर, रा.साकूर गाडेकर ता.संगमनेर अहमदनगर ३) ओमकार अजित घोडेकर (वय १९) धंदा ड्रायव्हर रा. साकुर घोडेकर मळा ता.संगमनेर, जि.अहमदनगर ४) आदेश सयाजी भुजबळ (वय १९ वर्षे) धंदा शेती रा.साकूर हळदावस्ती, ता.संगमनेर, जि.अहमदनगर ५) हर्षल राजेंद्र शिंदे (वय-२४ वर्षे) धंदा शेती रा.साकूर गाडेकरमळा ता.संगमनेर जि.अहमदनगर ६) श्रीकांत शिवाजी जाधव (वय २२ वर्षे) धंदा मासमारी विक्री रा. सातकरवाडी दहीवडी ता.शिरुर, जि. पुणे ७) करण नाना माळी (वय १९ वर्षे) धंदा शेती रा.दहिवडी मांजरेवस्ती ता.शिरुर, जि.पुणे मूळ रा. वागदरी ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर ८) सोनू विकास धुळे (वय १८ वर्षे) धंदा मजूरी रा आंवळे ता.शिरुर, जि.पुणे मूळ गाव वाडेबोल्हाई, थेऊर ता. हवेली, जि.पुणे यांना ताब्यात घेण्यात आले त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांनी गुन्हयातील चोरी केलेला माल आरोपी नामे ९) दिपक पांडुरंग सांगळे (वय २७ वर्षे) धंदा-भंगारविक्री रा.व्हाईटहाउस बोलेगाव फाटा नागपूर, ता जि.अहिल्यानगर यास विक्री केला असल्याचे सांगितल्याने त्याला सुद्धा गुन्हयाचे कामी ताब्यात घेण्यात आले आहे.



आरोपींनी गुन्हा करणेसाठी पिकअप चारचाकी वाहनाचा तसेच दुचाकी वाहनांचा वापर केला असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरचे पिकअप चारचाकी वाहन, सहा मोटार सायकल जप्त करणेत आलेल्या असून त्यापैकी एक मोटार सायकल चोरीची आहे. तसेच गुन्हयात चोरी केले मालापैकी ५०० किग्रॅ वजनाच्या तांब्याच्या पट्टया व तारा हस्तगत करणेत आलेल्या असून एकूण १४,५०,०००/- (१४ लाख ५० हजार रूपये) किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असून ४८ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. गुन्हयातील आरोपी नामे विशाल पवार याचे वर एकूण ११ मालमत्ता (मोटार सायकल) चोरीचे गुन्हे दाखल असून आरोपी प्रदीप शिंदे याचेवर ०३ गुन्हे दाखल असून तो ओतूर पोलीस स्टेशनकडील चोरीचे गुन्हयात फरार आहे.



अशा प्रकारे सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक संजय जाधव, बारामती विभाग, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग,उपविभागिय पोलिस अधिकारी,शिरुर प्रशांत ढोले,उपविभागिय पोलिस अधिकारी,दौंड स्वप्निल जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, स्था.गु.शा. चे सपोनि राहूल गावडे, योगेश लंगुटे, पोसई अभिजीत सावंत,पोउपनि एकनाथ पाटील स्थागुशा कडील अंमलदार तुषार पंदारे, दिपक साबळे, जनार्दन शेळके, राजु मोमीण, अतुल डेरे, सचिन घाडगे, अजित भुजबळ संजू जाधव, योगेश नागरगोजे, स्वप्निल अहीवळे, विजय कांचन, संदीप वारे, अमोल शेडगे, धिरज जाधव, सागर धुमाळ, अक्षय नवले, निलेश सुपेकर, अक्षय सुपे, हनुमंत पासलकर, दत्ता तांबे, रामदास बाबर, राहूल पवार, विनोद पवार, समाधान नाईकनवरे, तुषार भोईटे, मंगेश भगत, मपोना सुजाता कदम शिरूर पोस्टे. चे नितीन सुद्रीक, परशुराम सांगळे, नाथा जगताप, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, शिक्रापूर पो स्टे कडील अंमलदार किशोर तेलंग, प्रशांत गायकवाड, प्रतिक जगताप, यांनी केली असून आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशन करत आहेत.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!