नागपुर शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कार्यवाही,अवैध शस्त्रासह एकास घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अवैधरीत्या पिस्टल बाळगणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई…

नागपूर शहर (प्रतिनिधि) – गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने  कौशल्यपूर्णरित्या गोपनीय माहितीच्या  आधारावर अवैधरीत्या पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपीला शिताफीने अटक करून त्यांच्याकडून लोखंडी देशी बनावटीची रिव्हाल्वर,लोखंडी बनावटी पिस्टल माऊझर,काडतुस आसा एकून 78 हजार रु. चा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी पोहवा विजय यादव, नागपूर शहर गुन्हे शाखा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शेख आतिफ शेख लतिफ, वय 31 वर्षे रा.शांतीनगर घाट चौक पो.ठाणे शांतीनगर, नागपूर शहर याच्यावर 410/2024 कलम 3+25 भा.ह.का. सहकलम 135 मपोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





या बाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलिस ठाणे पाचपावली अप.क. 559/24 कलम 8 (क). 22 (क), 29 एन.डी.पी.एस. अॅक्ट-1985 यामध्ये जप्त मुद्देमाल 306 ग्रॅम मेफेड्रोन ड्रग पावडर मधील पाहिजे आरोपी शेख अतिक शेख लतिफ, हा त्याचे राहते ठिकाणी न राहता सध्या वाठोडा या ठिकाणी असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाल्यावरून दि.(25)जुलै 2024 रोजी संध्या.7.30 ते रात्री 10.05 वा चे दरम्यान गरीब नवाज चौक बडी मस्जीद जवळ नमुद आरोपीची झडती घेतली असता त्याचे जवळ 1) एक लोखंडी बनावटी पिस्टल माऊझर खाली मॅग्जीनसह कि.अं. 35,000/- रू. 2) एक लोखंडी देशी बनावटीची रिव्हाल्वर कि.अं. 30,000/- रू. 3) अ) रिव्हाल्वरचे एकुण 04 मोठे जिवंत टोकदार काडतुस, प्रत्येकी 1,000/- प्रमाणे 4,000/- रुपये, ब) रिव्हाल्वरचे एकुण 07 मोठे जिवंत काढतुस समोरुन गोल असलेले व मागिल पेंदयावर इंग्रजीत 8mm असे लिहीलेले प्रत्येकी 1,000/- प्रमाणे 7,000/- रुपये, क) पिस्टल माऊझरचे एकुण 02 लहान जिवंत काडतुस समोरुन गोल असलेले, प्रत्येकी 1,000/- प्रमाणे 2,000/- रु, 4) एक सोनेरी रंगाची लेडीज पर्स किं.अं. 00/00 रुपये व एक पांढऱ्या रंगाची प्लॅस्टीक पिशवी किं.अं. 00/- रुपये असा एकुण 78,000/- रुपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करून ताब्यात घेतला.



नमूद आरोपी विरूध्द पोलिस ठाणे वाठोडा, नागपूर शहर येथे कलम 3+25 भा.ह.का., सहकलम 135 मपोका अन्वये गुन्हा दाखल केला. सदर नमुद आरोपी शेख अतिक शेख लतिफ याने सदरचे शस्त्र हे राहिल खान उर्फ सलमान, वय अंदाजे 28 वर्ष, रा. बहराईच, याचेकडून उत्तरप्रदेश याठिकाणी जावून अग्नीशस्त्र व जिवंत काडतुस आणले असुन, लाखनी, जि. भंडारा येथे त्याचे विरुध्द दाखल असलेल्या गुन्हयातील बळीत इसम तन्नु उर्फ अब्दूल तनवीर याचा भाऊ रन्नु उर्फ अब्दूल रहेमान याचेशी असलेल्या वैमनस्याच्या पार्श्वभुमीवर सदरचे अग्नीशस्त्र बाळगल्याचे सांगितले आहे.



नमुद आरोपी शेख अतिक शेख लतिफ,विरूध्द विविध पोलिस ठाणे येथे गंभीर  गुन्हे दाखल असुन त्यात 1)पोलिस ठाणे  शांतीनगर अप.क्र. 31/2017, कलम 452, 324, 34 भादंवि 2)पोलिस ठाणे लाखनी जि. भंडारा अप.क. 114/23 कलम 302, 201, 120 (ब), भादंवि सहकमल 4+25 भाहका, सहक. 135 मपोका. 3) पोलिस ठाणे तहसिल अप.क. 175/24 कलम 399, 402 भादंवि सहकमल 4+25 भाहका, सहक. 135 मपोका. 4) पोलिस ठाणे शांती नगर अप.क. 135/24 कलम 3+25 भा.ह.का., सहकलम 135 मपोका 5) पोलिस ठाणे पाचपावली अप.क. 559/24 कलम 8(क).22 (क), 29 एन.डी.पी.एस. अॅक्ट-1985 तसेच नमुद आरोपी विरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली होती

सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंघल, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील, पोलिस उप आयुक्त गुन्हे, निमीत गोयल,सहा पोलिस आयुक्त गुन्हे शाखा, डॉ. अभिजीत पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा अंमली पदार्थ पथकाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने, पोहवा विजय यादव, विवेक अढाऊ,मपोहवा अनुप यादव नापोशि राशीद शेख,पोशि शेषराव रेवतकर, रोहीत काळे,पोशि राहुल पाटील, एन.डी.पी.एस. पथक, गुन्हे शाखा, नागपुर शहर तसेच पोउपनि अनिल इंगोले व नापोशि अजय शुक्ला वाहन चोरी विरोधी पथक,गुन्हे शाखा, नागपूर शहर यांनी केली

सदर गुन्हयांचा पुढील तपास पो.नि. हरीश बोराडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे वाठोडा येथे सुरू आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!