
बळजबरीने मोबाईल हिसकावनारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
जबरीने मोबाईल हिसकावून नेणारे दोघेजण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले गजाआड…
लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा, यांनी गोंदिया जिल्ह्यात चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना जेरबंद करून गुन्हे उघडकीस आणण्याकरीता निर्देश स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते. त्या अनुषंगाने वरिष्ठांचे प्राप्त आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे, पथक पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात जिल्ह्यातील चोऱ्या , घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगारांचा कशोशिने शोध घेवून गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत आहेत


त्यानुसार घटना दि(22) जुलै 2024 रोजी फिर्यादी रतनलाल फत्तुलाल दमाहे रा. नवेगाव सालेकसा हे आमगाव वरून आपले गावी मोटार सायकलने जात असता साखरीटोला (झालीया) येथील नदीकाठावर असलेले शिवमंदिरच्या समोर दोन अनोळखी ईसमांनी फिर्यादीच्या मोटार सायकलला थांबविण्याचा ईशारा दिल्याने फिर्यादी हा थांबुन मोटार सायकलच्या खाली उतरल्यावर त्या दोन्ही अनोळखी चोरांनी त्याचे खिशातील मोबाईल टेक्नो कंपनीचा मोबाईल कि 5000/- रू. व मोबाईलच्या कवरमध्ये असलेले नगदी 150/-रू. असा मुद्देमाल बळजबरीने हिसकावुन घेवुन पळुन गेले असून फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोलिस स्टेशन सालेकसा येथे अपराध क्रमांक- 227/2024 कलम 304(2), 3 (5) भारतीय न्याय संहिता- 2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून तपासात आहे

स्थागुशा पथकाने सदर गुन्ह्याचे समांतर तपास करीत असताना पथकास सदर गुन्ह्यातील अज्ञात संशयित आरोपी हे आमगाव येथील असल्याची खात्री लायक माहिती प्राप्त झाली त्यावरून पथकाने संशयित आरोपी 1) धनराज रामचंद मच्छीरके वय 31 वर्ष राहणार वार्ड क्रमांक पाच गुरुदेव नगर खामगाव पावर हाऊस जवळ 2) सागर केवलचंद भोंडे वय 30 वर्ष वार्ड क्रमांक 6 विठ्ठल नगर, आमगाव सदर गुन्हात निष्पन्न करुन ताब्यात घेण्यात आले दोन्ही संशयीतांना नमूद गुन्ह्याचे घटनेबाबत सविस्तर विचारपुस चौकशी केली असता दोन्ही संशयित आरोपींनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली व आरोपींचे ताब्यातून गुन्हयातील जबरीने हिसकावून नेलेला टेक्नो कंपनीचा मोबाईल किमती 5000/-रुपये व नगदी 150/- रुपये हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आला आरोपींना सालेकसा पोलिसांचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सालेकसा पोलिस करीत आहेत

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे,अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा,पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा दिनेश लबडे,पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन सालेकसा भुषण बुराडे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. महेश विघ्णे, पो.हवा विठ्ठल ठाकरे, इंद्रजित बीसेन, पो.शि. अजय रहांगडाले, हंसराज भांडारकर, चा.पो.हवा लक्ष्मण बंजार तसेच तांत्रीक सेल चे दिक्षित दमाहे, रोशन येरने यांनी कामगिरी केली आहे .


