
बुलढाणा गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरीचे ५ गुन्हे उघड करुन,३ लाखाचेवर मुद्देमाल केला हस्तगत..
स्थानिक गुन्हे शाखेने अट्टल मोटारसायकल चोरट्यांना केली अटक; 3 लाख 48 हजारांचा मुद्देमाल जप्त…
बुलढाणा (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खामगांव आणि मलकापूर परिसरातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेवून, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मो.सा. चोरीच्या 05 गुन्ह्यांची यशस्वी उकल करून चोरीच्या 08- मो.सा., 01- स्कुटी ज्यांची किं.3 लाख 48 हजार ह्या जप्त करून दोन आरोपींना अटक केली आहे.


गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये होत असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेवून, पोलिस अधिक्षक सुनिल कडासने, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, बी.बी. महामुनी यांनी अशा गुन्ह्याची उकल करुन, आरोपींची शोध घेवून, मुद्देमाल हस्तगत करणेबाबत पोलिस निरीक्षक अशोक लांडे प्रभारी, स्था.गु.शा. बुलढाणा यांना आदेशीत केले होते. सदर गुन्ह्याचे अनुषंगाने पोनि. अशोक लांडे यांनी त्यांचे अधिनस्त पोलिस अधिकारी व अंमलदार यांची स्वतंत्र पथके तयार करुन, मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करुन, गुन्ह्याची उकल, आरोपींचा शोध आणि गेलेला मुद्देमाल हस्तगत करणेबाबत सुचना केल्या. सदर अनुषंगाने, (1) पो.स्टे. खामगांव शहर अप.क्र 388/2024 कलम 303(2) भा.न्या.सं. गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी जगन्नाथ माधवराव आंभोरे रा.एकलारा ता.चिखली यांनी (दि.05ऑगस्ट) रोजी पो.स्टे. खामगांव शहर येथे रिपोर्ट दिला की, (दि.01ऑगस्ट) रोजी खामगांव येथील बैल बाजारामध्ये आले असतांना, त्यांची मोटारसायकल होंडा सीबी शाईन क्र.MH-28-AY-4951 किं.35,000/-रुपये ही कोणी तरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. या प्रकरणी पो.स्टे. खामगांव शहर. अप.क्र 388/2024 कलम 303(2) भा.न्या.सं. प्रमाणे दाखल होता. सदर गुन्ह्याचा तपास करुन, गुन्ह्यात 1) ईमरान शहा दिलबर शहा वय 26 वर्षे रा. खैवाळी, नांदुरा ता.नांदूरा जि. बुलढाणा या आरोपीला नांदूरा परिसरातून अटक करून त्याच्या ताब्यातून 1) होंडा शाईन कंपनीच्या 04 मोटार सायकली 2) एच.एफ. डिलक्स कंपनीच्या 02 मो.सा.स्प्लेंडर प्लस कंपनीची 01 मो.सा. 3) पेशन प्रो. कंपनीची 01 मो.सा. अशा एकूण सर्व 08 मो.सा. ज्यांची किं.3,20,000/-रुपये

तर दुसऱ्या गुन्ह्यात (दि.20जुलै) रोजी पो.स्टे. मलकापूर शहर येथे होंडा कंपनीची मोटार सायकल क्र.MH-28-AU-6166 कि.28,000/- रुपये ही अज्ञात चोरट्याने चोरुन नेली असल्याबद्दल, पो.स्टे. मलकापूर शहर येथे गुरनं. 355/2024 कलम 303(2) प्रमाणे गुन्हा नोंद होता. सदर गुन्ह्याचा पथकाने समांतर तपास करुन, गुन्ह्यात योगेश वानखडे रा.मलकापूर ता. मलकापूर जि. बुलढाणा या आरोपीला निष्पन्न करुन त्यास मलकापूर परिसरातून अटक करून त्याच्या ताब्यातून होंडा कंपनीची मोटारसायकल क्र.MH-28-AU-6166 कि.28,000/-रुपये हि जप्त केली. पकडण्यात आलेल्या वरील आरोपींनी विचारपूस दरम्यान खामगांव शहर-02, मलकापूर शहर-01, मलकापूर ग्रामीण-01, अकोला जिल्हा-01 अशा एकूण 05 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. उर्वरीत गुन्ह्यांची उकल करणे सुरु आहे,
पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.अशोक एन.लांडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांकडून गुन्ह्यामध्ये हस्तगत मोटार सायकल संबंधाने तपास होऊन, सदर गुन्ह्यांमध्ये ईतर आरोपींचा सहभाग निष्पन्न करुन, आरोपी अटक करण्या बाबतची कारवाई करण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी.बी. महामुनी यांनी गुन्ह्यातील आरोर्पीचा शोध, गुन्ह्यांना प्रतिबंध बाबत सुचना दिल्या होत्या. सदर अनुशंगाने, पोनि. अशोक एन. लांडे, स्थानिक गुन्हे शाखा- बुलढाणा यांनी वेगवेगळी पथके तयार करुन, त्यांना गुन्हे संबंधाने गोपनीय माहिती संकलीत करणे, गुन्हेगारांची माहिती काढून त्यांचे हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे, तांत्रीक स्वरुपातील बाबी पडताळणे, जिल्हा व जिल्हया बाहेरील गुन्हेगारांचा अभिलेख पडताळणे बाबत सुचनात्मक मार्गदर्शन केले. एकंदर समांतर तपासामध्ये गुन्ह्यामध्ये वरील प्रमाणे आरोपीतांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्या प्रमाणे गोपनीय माहिती व तांत्रीक माहितीच्या आधारे वरील प्रमाणे गुन्ह्यांची उकल करुन, वरील प्रमाणे 02 आरोर्पीना ताब्यात घेवून, 08-मोटार सायकली, 01 स्कुटी वाहन असे एकूण 09 दुचाकी वाहने किं.3,48,000/-रुपये हस्तगत करुन, संबंधीत पो.स्टे.च्या ताब्यात पुढील कारवाईकामी देण्यात आले. या कारणाने जिल्ह्यातील गुरांच्या चोरीच्या गुन्ह्यांची यशस्वी उकल होवून, अशा गुन्ह्यांना प्रतिबंध झालेला आहे.
अशा प्रकारे सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक सुनिल कडासने- अपर पोलिस अधिक्षक खामगाव, अशोक थोरात अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा, बी.बी महामुनी यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली, पोनि.अशोक एन.लांडे प्रभारी अधिकारी स्था.गु.शा. बुलढाणा, सपोनि. रुपेश शक्करगे, पोहवा. पुरुषोत्तम आघाव, नापोशि.गणेश पाटील, पोशि.जयंत बोचे, गणेश शेळके, चालक पोशि. विलास भोसले सर्व नेमणूक स्थागुशा. बुलढाणा यांनी केली आहे.


