
हिंगणघाट शहरात देशी दारुची खेप टाकणारा डी बी पथकाचे ताब्यात…
दुचाकीवर शहरात दारुची खेप टाकणारा डी बी पथकाचे ताब्यात…
हिंगणघाट(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरन पथकाचे अंमलदार हे पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मुखबिर कडुन खात्रीशीर गोपनीय खबर मिळाली की, स्वीपर कॉलनी,हिंगणघाट येथे एक इसम एका टीव्हीएस Jupiter मोपेड वाहनावर देशी दारूची अवैदयरित्या वाहतूक करून घेवून येत आहे,


अशा खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहीती ठाणेदार मनोज गभने यांना देवून त्यांचे आदेशाने स्वीपर कॉलनी हिंगणघाट येथे पोस्टाँप सह रवाना होवून तेथे नाकाबंदी केली. असता मिळालेल्या माहीती प्रमाणे टीव्हीएस कंपनीची सिल्वर ग्रे रंगाची Jupiter मोपेड वाहन येतांना दिसल्याने त्यास पोस्टाफचे मदतीने नाकाबंदी करून वाहन थांबवले असता सदर वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले.त्याने त्याचे नाव गाव रवींद्र शंकर मेकलवार वय 24 वर्ष रा. संत चोखोबा वार्ड,हिगणघाट असे सांगितले.पंचासमक्ष मोक्यावर मोपेड वाहनांची पाहणी केली असता मोपेड गाडीचे पायदानवर ठेवून असलेल्या चुगडी मध्ये देशी दारूने भरून असलेल्या प्रीमियम न.1 कंपनीचा 90 ml चा 200 सीलबंद शिश्या प्रती 100 रु. प्रमाणे 20,000 रु. जुनी वापरती टीव्हीएस कंपनीची सिल्वर ग्रे रंगाची Jupiter मोपेड वाहन क्र.mh 32 aw 1401 किंमत 90,000 रु. असा एकून 1,10,000 रू चा माल विनापास परवाना वाहतूक करतांना मिळुन आल्याने पंचासमक्ष मौक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर माल जप्त करून आरोपी विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अप्पर पोलिस अधिक्षक डाँ. सागर रतनकुमार कवडे उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडीत,पोलिस निरीक्षक.मनोज गभने, पोलीस हिंगणघाट यांचे आदेशाने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील पो.उपनि सतीश जायभाये यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे पोलिस हवालदार प्रशांत ठोंबरे, नापोशि राहुल साठे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. विजय काळे, पो.शी. अमोल तिजारे ,पो.शी संदीप उईके,पो.शी रोशन चाचेर यांनी केली. सदर गुन्हयांच पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहे.



