
संकल्प नशामुक्ती अभियाना अंतर्गत कामशेत पोलिसांनी पकडला ९८ किलो गांजा,आरोपी अटकेत…..
कामशेत पोलीसांची दमदार कामगिरी गोपनीय माहितीच्या आधारे चारचाकी वाहनासह एकुन ५६ लाख, ९२ हजार रु किंमतीचा गांजा केला जप्त….


कामशेत(लोणावळा-पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. (२२) ॲागस्ट २०२४ रोजी सकाळी कामशेत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रविंद्र पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमी मिळाली की ताजे ता. मावळगावचे हददीतून जुने हायवे रोड कडून ताजे गावाकडे जाणारे रोडमार्गे मळवली, लोणावळाकडे ४ इसम त्यांचे सिल्हवर रंगाचे वेरना कारमधुन गांजांची वाहतुक करणार असलेची माहीती मिळाली

लागलीच सदरची माहीती त्यांनी सहा पोलिस अधिक्षक,लोणावळा यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शना प्रमाणे दोन पथके तयार करून पंचांचे उपस्थितीमध्ये सापळा लावला. त्यानंतर मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार एक वेरना कार नंबर एम.एच/१४/जी.वाय/०५५० हि जुने हायवे रोडणे ताजे गावाकडे आलेली दिसली त्यावेळी सापळा कारवाईसाठी तयार पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना पोलिस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी दिलेल्या सुचने प्रमाणे छापा घालून कारची व डिकीची पाहणी केली असता डिकीमध्ये एकूण ९८ किलो वजनाचा गांजा हा अंमलीपदार्थ मिळून आला सदर कार मधील १) अभिषेक अनिल नागवडे, वय २४, २) प्रदिप नारायण नामदास, वय २५ वर्षे, ३) योगेश रमेशलगड, वय ३२ वर्षे, ४) वैभव संजीवण्न चेडे, वय २३ वर्षे, सर्व रा.पी.एम.टी. स्टॉप जवळील, मराठी शाळे जवळ, कारेगांवता. शिरूर जि.पुणे यांना सदर प्रकरणी ताब्यात घेण्यात आले असुन छाप्यामध्ये मिळून आलेला एकुण ९८ किलो वजनांचा गांजा एकूण ४८ लाख ५० हजार रूपये तसेच ८ लाख रूपये किंमतीची वेरना कार, ४२ हजार रूपये किंमतीचे ३ मोबाईल हँडसेट असे एकूण ५६ लाख ९२ हजार रूपये किंमतीचा मुददेमाल मिळून आलेन तोपंचा समक्ष जप्त केला आहे.

त्यावरून सदर इसमांवर कामशेत पोलिस स्टेशनला गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम ८ (क) २० (क) अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रविंद्र पाटील हे करीत आहेत.सदरची कार्यवाही सहा.पोलिस अधिक्षक लोणावळा सत्यसाई कार्तिक यांचे संकल्पनेतुन संकल्प नशामुक्ती अधियान अंतर्गत करण्यात आली असुन आतापर्यंत वर्षभरात एकुन ७१ केसेस करण्यात आल्या असुन एकुन १ करोड ९७ लक्ष रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक, पंकज देशमुख, अपर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे,सहा. पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,लोणावळा सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र पाटील, पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहा फौजदार नितेश कदम, पोलिस अंमलदर, रविंद्र रावळ, जितेंद्र दिक्षित, समिर करे, रविंद्र राय, गणेश तावरे, प्रतिक काळे, गणेश ठाकुर, शिवाजी टकले, सचिन निंबाळकर, पवन डोईफोडे, होमगार्ड सुशिल लोखंडे, रामदास पोटफोडे यांनी कारवाई केली.


