पदभार स्विकारताच नुतन पोलिस अधिक्षक आले ॲक्शन मोडवर,सर्व प्रभारींना दिलेत सक्त आदेश…
वर्धा नुतन पोलिस अधिक्षक रुजू होताच आले ॲक्शन मोडवर,स्थानिक गुन्हे शाखा व जिल्ह्यातील सर्व प्रभारिंना दिलेत अवैध धंद्यावर कडक कार्यवाही करण्याचे आदेश….
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,वर्धा जिल्हा पोलिस अधिक्षक पदी नव्याने रूजू झालेले अनुराग जैन यांनी वर्धा जिल्हा पोलिस दलाची सुत्रे सांभाळताच जिल्हयातील अवैध दारू वाहतुक व विक्री करणारे, अंमली पदार्थ तस्करी करणारे, जुगार-सट्टा चालविणारे तसेच रेती माफिया अशा अवैध धंद्यांवर अंकुश लावण्याकरिता जिल्हा पोलीस दलातील सर्व अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेवून आदेशित केलेले असून जिल्हयातील सराईत गुन्हेगारांवर सतत पाळत ठेवून कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
नुकताच विशेष पोलिस महानिरीक्षक,नागपुर परीक्षेत्र नागपुर दिलीप पाटील भुजबळ यांनी जिल्ह्यात आढावा बैठक घेतली त्यातही त्यांनी अवैध धंदे संदर्भात कडक कार्यवाही करण्याचे सुचना जिल्हा प्रभारींना दिलेल्या आहेत त्यानुसार जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेला अवैध दारू वाहतुक व विक्री करणारे, अंमली पदार्थ तस्करी करणारे, अवैध जुगार-सट्टा चालविणारे तसेच रेती माफिया यांचेवर कडक कारवाईचे आदेश देवुन जिल्ह्यातील टोळीतील सराईत गुन्हेगार यांची स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा येथे परेड घेण्यात आली व गुन्हेगारांच्या वागणुकीत सुधारणा झाली नाही तर त्यांचेविरूध्द MPDA/MCOCA अंतर्गत अत्यंत कडक कायदेशिर कारवाई करण्यात येणार असल्याबाबत समज देण्यात आली.
तसेच जिल्हयातील सर्व प्रभारी पोलीस अधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रातील सर्व निर्जन स्थळांची पाहणी करून त्या ठिकाणी पेट्रोलींग करण्याचे तसेच महिला व मुलींच्या सुरक्षेसंबंधाने पोलिस काका-पोलिस दीदी उपक्रम राबविण्याबाबत सुचना देवून जिल्हयातील सर्व शाळा, महाविद्यालये व वसतीगृहाचे लगत १०० मिटर परिसरात तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या पानटपरी वर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेला पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॉ. सागर कवडे यांचे आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा व वर्धा जिल्हयातील सर्व पोलिस स्टेशन अंतर्गत मागील अकरा दिवसात अवैध दारू वाहतुक व विक्री संबंधाने जिल्हयात सर्वत्र मोठ्या प्रमाणात छापेमारीचे सत्र सुरू असुन यामध्ये दारूची अवैध वाहतुक करणा-या सराईत २१५ दारूविक्रेत्यांवर व वाहतुक करणा-यांवर कारवाई करून त्यांचेकडून वाहनासह ८५,८८,३५०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच मोठयाप्रमाणात वॉश आऊट मोहिम राबवुन १४,४८,६७०/- रू.ची गावठी मोहा दारू/सडवा रसायन नाश करण्यात आले असुन जिल्हयातील अवैध धंद्यांवर प्रभावीपणे आळा घालण्याचे दृष्टीने संबंधीतांवर कडक कायदेशिर कारवाई करण्यात येत आहे.