
संशईतांना ताब्यात घेऊन वाडी पोलिसांनी उघड केले १० घरफोडीचे गुन्हे…
वाडी पोलीसांनी संशईतांना ताब्यात घेऊन वाडी येथील घरफोडीसह उघड केले १० घरफोडीचे गुन्हे…..
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(०६) जुलै २०२४ चे रात्री ९.१५ वा. ते रात्री ११.३० वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे वाडी हद्दीत प्लॉट नं. १९९९, विकास नगर, खडगाव रोड, वाडी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी सुरेश महेश राठोड वय ३७ वर्ष, हे त्यांचे राहते घराचे दाराला कुलूप लावुन परिवारासह बाहेर जेवण करण्याकरीता गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन, आत प्रवेश केला व घरातील रोख ३०,०००/- रू. तसेच एक कोडक कंपनीचा टि.व्ही असा एकुण किंमती अंदाजे ४८,०००/- रू चा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे वाडी येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५ (अ), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.


गुन्हयाचे तपासात वाडी पोलिसांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून यातील संशईत आरोपी तरूण उर्फ तुफान अशोक मेश्राम वय २४ वर्ष, रा. जेपीनगर, जुनी कामठी, ह.मु., वैभवनगर, टेकडी वाडी, नागपूर यास निष्पन्न करुन त्यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, आरोपीने नमुद घरफोडी त्याचा साथिदार आरोपी २) अमन मधुकर बारसागडे वय २६ वर्ष रा. घर नं. ७०३५, गौतम नगर, टेकडी वाडी, नागपूर याचे सोबत संगणमत करून केल्याची कबुली दिली.

आरोपींना अधिक विचारपूस केली असता, आरोपींनी पोलीस ठाणे वाडी हद्दीत वरील घरफोडी व्यतीरिक्त ईतर ०५ ठिकाणी घरफोडी केल्याची तसेच पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत ०१ घरफोडी व पोलीस ठाणे कुही, नागपूर ग्रामीण हद्दीत ०२ घरफोडी व पोलीस ठाणे केळवद, नागपूर ग्रामीण हद्दीत ०१ घरफोडी अश्या एकुण १० घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपींचे ताब्यातुन एक कोडक कंपनीचा टि.व्ही, सोन्या-चांदीचे दागिने व गुन्हयात वापरलेले स्प्लेंडर मोटरसायकल असा एकुण २,८६,९००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपींकडुन घरफोडीचे एकुण १० गुन्हे उघडकीस आणले आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविन्द्रकुमार सिंगल, सहपोलिस आयुक्त निसार तांबोळी,अपर पोलिस आयुक्त(दक्षिण विभाग) शिवाजीराव राठोड, पोलिस उप आयुक्त परीमंडळ १ निमीत गोयल, सहा पोलिस आयुक्त (एम.आय.डी.सी. विभाग) सतिश गुरव, यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि. राजेश तटकरे,पोलिस निरीक्षक गुन्हे एस.बी देशमुख, सपोनि. राहुल सावंत, पोहवा. तुलसिदास शुक्ला नापोशि अजय पाटील, दुर्गादास माकडे, सोमेश्वर वर्षे, राहुल बोटरे यांनी केली.


