रहस्यमय फिल्मी स्टाईल खुनाचा बेलतरोडी पोलिसांनी उलगडा करुन,मुख्य आरोपीस केले जेरबंद…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

बेलतरोडी हद्दीतुन ३२ वर्षीय तरुणीस फुस लावुन तिची फिल्मी स्टाईल हत्या करुन तिचा म्रुतदेह खड्यात पुरवुन पुरावे नष्ट करणार्या भारतीय सेनेतील जवानास बेलतरोडी पोलिसांनी केले जेरबंद करुन अतिशय गुंतागुंतीच्या खुनप्रकरणाचा केला उलगडा…

नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (१७)सप्चेंबर.२०२४ फिर्यादी रिध्देश्वर प्रकाश आकरे, वय २९ वर्ष, रा. हुडको कॉलोनी, कळमेश्वर, जि. नागपूर यांनी बेलतरोडी पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली की त्यांची बहिण  ज्योत्सना प्रकाश आकरे, वय ३२ वर्ष, ही (२८)ॲागस्ट.२०२४ रोजी रात्रीचे ९.०० वा. चे सुमारास, बेलतरोडी हद्दीतुन मैत्रीणीचे घरून काहीही न सांगता निघुन गेली होती. यावरून पोलिस ठाणे बेलतरोडी येथे मिसींग दाखल करण्यात आली होती.





सदर मिसींग महिलेचा शोध सुरू असतांना बेलतरोडी पोलिसांनी तांत्रीक द्रुष्टया तपास केला असता तिच्या मोबाईलचे लोकेशन हैदराबाद येथे दाखवत होते. यावरून बेलतरोडी पोलिसांना घातपाताचा संशय आल्याने यातील फिर्यादी रिध्देश्वर प्रकाश आकरे यांनी रोजी दिलेल्या रिपोर्टवरून पोलिस ठाणे बेलतरोडी येथे कलम १४० (३) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.



सदर गुन्हयाचे तपासात पोलिस उप आयुक्त परि. ४ रश्मिता राव यांचे मार्गदर्शनात सायबर सेलचे अंमलदाराकडुन पिडीत महिलेचे मोबाईलचे लोकेशन काढले असता ते मध्ये प्रदेश येथे दाखवत होते. यावरून पथक मध्यप्रदेश येथे पाठवुन खात्री केली असता, सदर मोबाईल हा ट्रक मध्ये असल्याचे निष्पन्न झाले, व ट्रकचालका कडुन मोबाईल जप्त करण्यात आला.



सदर मोबाईलचे सि.डी.आर व टावर लोकेशनचा अभ्यास केला असता, सदर महिलेच्या संपर्कात एक नंबर कायम असल्याचे कळले सदर क्रमांकाचा मोबाईल हा अजय आनंद वानखेडे, वय ३३ वर्ष, रा. न्यू कैलास नगर, अजनी, नागपूर याचा  असल्याचे समजले. व तो क्रमांक घटनेचे दिवशी एकाच ठिकाणी असल्याचे निष्पन्न झाले.

अजय आनंद वानखेडे नावाचा सदर ईसम  हा भारतीय सैन्यात नोकरीला असल्याने त्यास कायदेशीररित्या ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्याने कट रचुन, नियोजन करून, सदर महिलेचे अपहरण केले व , तिचा खुन करून, तिला गोसाई नगर येथील रेल्वे पटरीचे बाजुला गड्डा करून गुन्हयातील पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने त्यामध्ये प्रेत पुरवुन त्यावर सिमेंट कॉकेट केल्याची कबुली दिली. याप्रकरणी फिर्यादी रिध्देश्वर प्रकाश आकरे,याने दिलेल्या तक्रारीवरून व सदर गुन्हयाचे तपासावरून सदर गुन्हयात कलम १४०(१), १०३(१), २८५ भा.न्या.सं. अन्वये वाढ करून सदर आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा. रविन्द्रकुमार सिंगल, सहपोलिस आयुक्त निसार तांबोळी,अपर पोलिस आयुक्त(दक्षिण विभाग)  शिवाजीराव राठोड, पोलिस उपायुक्त परीमंडळ ४ रश्मीता राव ,सह पोलिस आयुक्त(अजनी विभाग). विनायक कोते यांचे मार्गदर्शानाखाली, बेलतरोडी पोलिस ठाणे येथील वरीष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे,सपोनि रामेश्वर कांडोरे,पोउपनि शिरीष सलगर,पोहवा दिलीप कश्यप, सुमेन्द्र बोपचे सुहास शिंगणे इत्यादी लोकांन यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!