
वणा नदीचे पात्रातुन रेतीचे अवैधरित्या उत्खनन करुन चोरटी वाहतुक करणारे गुन्हे शाखेने घेतले ताब्यात,८५ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…
स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस स्टेशन समुद्रपूर हद्दीतील वणा नदीचे पात्रातील रेतीची चोरी करून वाहतूक करणारे पाच ट्रॅक्टर, ट्रॉली , दोन जेसीबी व रेतीसह एकुण 85,25,000/-रु चा मुद्देमाल केला जप्त…
समुद्रपुर(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याचे पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी सर्व प्रभारींना दिले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे दिनांक 26/11/24 रोजी हिंगणघाट उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना वणा नदी पात्रातील रेतीघाटातुन दोन जेसीबी व ट्रॅक्टरचे ट्राँलीद्वारे अवैद्यरित्या रेतीचे उत्खनन करुन त्याची चोरटी वाहतुक करीत आहे अशी गोपनीय माहीती मिळाली



सदरची माहिती वरीष्ठांना कळवुन मिळालेल्या माहीतीप्रमाणे पोलिस स्टेशन समुद्रपूर हद्दीत वणानदी रेतीघाटात छापा टाकला असता सदर ठिकाणी अवैद्यरित्या रेतीचे उत्खनन करुन त्याची चोरटी वाहतुकीकरीता भरलेले पाच ट्रॅक्टर ट्रॉली सह रेती भरून असलेले मिळून आले तसेच सदर रेतीघाटामध्ये दोन जेसीबी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये मध्ये काळी ओली रेती भरून देताना मिळून आल्याने सदर ठिकानावरुन आरोपी 1) जेसीबी चालक – गजानन छगन तामसवाडे, वय 30 वर्ष, रा. ब्राह्मणी ता. जि. नागपूर 2) जेसीबी चालक – श्रावण रामचंद्र सीडाम, वय 32 वर्ष, रा. हरणखुरी, त. समुद्रपूर जि. वर्धा 3) ट्रॅक्टरचा चालक – यशवंत परसराम दाते, वय 43 वर्षे, रा. कांढळी, ता. समुद्रपूर, जि. वर्धा 4) ट्रॅक्टर चालक – अरविंद अशोकराव कोटनाके, वय 30 वर्ष, रा. रामनगर, त. समुद्रपूर, जि. वर्धा 5) ट्रॅक्टर चालक – अमोल गोविंदराव डोमकावळे, वय 28 वर्ष रा. कांढळी, ता समुद्रपूर, जि. वर्धा 6) ट्रॅक्टर चालक – आकाश भाऊराव कन्नाके, वय 29 वर्ष, रा. हरणखुरी, ता. समुद्रपूर, जि. वर्धा 7) ट्रॅक्टर चालक – प्रशांत देवराव चौधरी, वय 30 वर्ष, रा. निरगुडी, त. समुद्रपूर, जि. वर्धा यांना ताब्यात घेऊन आरोपी क्र 8) जेसीबी व ट्रॅक्टर मालक – महादेव वांदिले, कांढळी, त. समुद्रपूर, जि. वर्धातसेच आरोपी क्र 9) जेसीबी व ट्रॅक्टर – मालक युवराज कारमोरे, रा. कांढळी त. समुद्रपूर, जि. वर्धा, पसार झाले

सदर छिकाणी आढळुन आलेले आरोपी क्र १ ते ६ यांचे ताब्यातुन पाच ट्रॅक्टरद्वारे व दोन जेसीबीव्दारे शासनाचा कोणताही पास परवाना ( रॉयल्टी ) नसतांना अवैधरित्या विना पास परवाना ओल्या काळ्या रेतीची कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी न घेता (गौण खनिज) रेती अवैद्यरित्या उत्खनन करून चोरून वाहतूक करताना मिळून आले पाच ट्रॅक्टर, ट्रॉली , दोन जेसीबी व पाच ब्रास (500फुट) रेतीसह एकुण 85,25,000/- रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर नमुद आरोपीचे विरुद्ध पोलिस स्टेशन समुद्रपूर येथे गुन्हा नोंद करण्यात आले आहे
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे पुर्व आदेशाने प्रभारी पोलिस अधिक्षक, डॅा सागर रतनकुमार कवडे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोहवा हमीद शेख, नरेंद्र पाराशर, श्रीकांत खडसे, सचिन इंगोले, राजेश तिवसकर, रवी पुरोहीत, प्रमोद पिसे,पोशि रामकिसन ईप्पर, नितीन इटकरे, सागर भोसले, उदय सोळुंके सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, यांनी केली आहे.


