ATM कार्डची अदलाबदल करुन पैसे काढणारी टोळी यवतमाळ गुन्हे शाखेच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

ए.टी.एम. कार्ड बदलुन खात्यातुन पैसे काढुन घेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दोन आरोपीस अटक करुन ६,२५,०००/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ची कारवाई…

यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, तुळशीदास भानुदास गावंडे, रा. हरु ता दारव्हा जि यवतमाळ यांनी पोलिस स्टेशन दारव्हा येथे येऊन तक्रार दिली की. दि २५ जानेवारी रोजी ते त्याचे खात्यामधुन पैसे काढण्या करीता दारव्हा येथील एस.बी.आय बँकचे ए.टी.एम मध्ये गेले असता तेथे ए.टी.एम मधुन पैसे काढत असतांना त्याचे ए.टी.एम कार्ड एक दोन वेळा प्रयत्न करुन सुध्दा काम करीत नसल्याचे त्याचे जवळ उभा असलेला अनोळखी ईसम हा पाहत होता. त्यावेळी त्याने मला ए.टी.एम मधुन पैसे काढण्याची प्रक्रिया सांगीतली व कोणत्याही प्रकारे ए.टी.एम कार्ड साथ देत नसल्याने त्याने ए.टी.एम कार्डची हेरा फेरी करुन फिर्यादीस दुसरे ए.टी.एम कार्ड परत दिले.त्यानंतर फिर्यादीचे बैंक खात्यामधुन अज्ञात इसमाने विविध ठिकाणावरुन एकुण १,१५,०००/- रु विड्रॉल केल्याचे लक्षात आल्याने पोलिस स्टेशन दारव्हा येथे तक्रार दिल्यावरुन अप क्रमांक ५९/२०२५ कलम ३१८ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.





तसेच दि २५ जानेवारी रोजी सुध्दा अशा प्रकारचा गुन्हा करण्याचे पध्दतीचा पोलिस स्टेशन अवधुतवाडी अप क्रमांक ११०/२०२५ कलम ३१८ (४) भा.न्या. सं अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता



सदर दोन्ही गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधिक्षक कुमार चिता यांनी दोन्ही गुन्हे उघडकीस आणनेबाबत मार्गदर्शन व सुचना पोलिस निरीक्षक सतिश चवरे स्थानिक गुन्हे शाखा व अधिनस्त पथकातील अधिकारी व अंमलदार यांना दिल्या, त्यावरुन सदर दोन्ही गुन्हयाचा तपास करतांना सर्व तांत्रीक बाबी पडताळल्या असता सदर पध्दतीचे गुन्हे करणारी आंध्रप्रदेश व कर्नाटक येथील आरोपींची टोळी ही यवतमाळ येथे आली असल्याचे निष्पन्न झाले. यावरुन वरिष्ठांचे आदेशाने सदर टोळीतील सदस्यांचा शोध घेऊन गुन्हाचा पुढील तपास करण्यासाठी स्था.गु.शा येथील पथक आंध्रप्रदेश व कर्नाटक येथे रवाना होउन संशयीत आरोपीचा शोध घेत असतांना गोपनिय माहिती मिळाली की, (१) एस. कृष्णमुर्ती, रा. कोकंणती क्रॉस बाला समुद्रम जि अंतपुर ह.मु. पदमावती नगर तिरुपती आंध्रप्रदेश याने के.ए.३२ डी ५८८१ या वाहनाने त्याचे साथीदारासह महाराष्ट्र व इतर राज्यात जाउन लाोकांकडुन ए.टी.एम कार्ड बदलवून पैसे काढुन फसवणुकीचे गुन्हे केले आहे.



त्यावरुन पथकाने एस. कृष्णमुर्ती याचे दोन्ही गुन्हयातील साथीदार  २) मोहन्ना व्यंकटरमण चिंताला, वय ३० वर्ष, रा. राजीव नगर कॉलनी पिलेरु जि अनामया आंध्रप्रदेश व ३) कृष्ण मल्लप्पा भिमनळीकर, वय ३० वर्ष, रा. रतनपुर ता चितापुर जि गुलबर्ग आंध्रप्रदेश ह.मु. रेड्डी लेआउट बैंग्लोर कर्नाटक यांना तपासात हजर येण्याबाबत समज देउन त्यांचेकडे सखोल विचारपुस केली असता एस. कृष्णमुर्ती याचे सोबत त्यांनी दोन्ही गुन्हे केल्याची कबुली देउन त्यांचा साथीदार एस. कृष्णमुर्ती हा पसार असल्याचे सांगीतले. यावरुन दोन्ही आरोपीचे ताब्यातुन गुन्हयातील फसवणुकीची रक्कम १,२०,०००/- रु व गुन्हयात वापरलेले चारचाकी वाहन क्रमांक के.ए.३२ डी ५८८१ अं. किंमत ५,००,०००/- रु व मोबाईल किं ५,०००/- असा एकुण ६,२५,०००/- रु मुद्देमाल हस्तगत करुन पो.स्टे. दारव्हा व पो.स्टे. अवधुतवाडी येथील दाखल दोन्ही गुन्हे उघडकीस आणले. तसेच आरोपी क्र २ व ३ यांनी अशा प्रकारे नागपुर व इतर ठिकाणचे सुध्दा गुन्हे केल्याचे कबुल केले आहे. वरुन दोन्ही आरोपी यांना तपासकामी पो.स्टे. दारव्हा यांचे ताब्यात दिले असुन पुढील तपास पोलीस स्टेशन दारव्हा येथील अधिकारी करीत असून इतर जिल्हयामधील अधिक गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. तसेच आरोपी क्रमांक ०१ व ०२ हे सराईत गुन्हेगार असुन यांचेवर इतर राज्यांमध्ये अशाच प्रकारचे १० ते १२ गुन्हे नोंद आहेत.

सदर आरोपींची टोळी ही विविध माध्यमातुन डेबीट कार्ड गोळा करुन जेष्ठ नागरीक, ए.टी.एम कार्ड वापरण्याचे ज्ञान नसलेल्या इसमांना लक्षात ठेवून त्यांचेजवळुन हात चालाखीने ए.टी.एम कार्ड अदला बदली करुन त्यांचे बँके खात्यामधुन पैसे काढतात तरी नागरीकांनी अनोळखी व्यक्तीचे हातात आपले ए.टी.एम कार्ड देऊ नये तसेच त्याचा पिन कोड माहित होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे यवतमाळ पोलीस प्रशासनाकडून नागरीकांना सतर्क राहण्याचे आव्हाण करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी ही  पोलिस अधिक्षक, कुमार चिंता, अपर पोलिस अधिक्षक पियुष जगताप, पोलिस निरीक्षक  सतिश चवरे स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सपोनि विजय महाले, पोलिस अंमलदार बबलु चव्हाण, सोहेल मिर्झा, किशोर झेंडेकर, मिथुन जाधव, अमित झेंडेकर, जितेंद्र चौधरी व अमित कुमरे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ व प्रणय इटकर, प्रगती कांबळे, रोशनी जोगडेकर सायबर सेल यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!