अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट २ ने दरोड्याचा गुन्हा केला उघड….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

फ्रेजरपुरा हद्दीतील दरोडा प्रकरणात एका विधिसंधर्षित बालकांसह  ४ आरोपींना ताब्यात घेऊन,गुन्हे शाखा युनीट २ ने केला उघड…

अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि २८ मार्च २०२५ रोजी वेदांत गिरीश मानमोडे वय १९ वर्ष रा. बुधवारा अंबागेट अमरावती यांचे मित्र  संस्कार साहु यांचेसह त्याचे मोपेड गाडीवर राजेंद्र गोडे महाविद्यालय जवळुन जात असतांना मागुन चार मोटार सायकलवर ५ ते ६ इसम आले त्यातील दोन इसमांनी त्यांचे मोटार सायकलने  यांच्या मोपेड गाडीला धडक मारून त्यांना खाली पाडले. व त्या ५ ते ६ इसमांनी वेदांत गिरीश मानमोडे व त्यांचा मित्र यांना घेराव करून ५ ते ६ इसमापैकी एकाने त्याच्या जवळील चाकु काढुन वेदांत गिरीश मानमोडे यांचा मित्र संस्कार यांचेवर चाकुने दोन वेळा वार करून त्यांना खाली पाडले तसेच वेदांत गिरीश मानमोडे यांचे मित्राजवळ असलेला कॅमेरा कि.अं. २,६०,०००/- रू चा जबरीने चोरून नेला. त्यानंतर सदरचे आरोपी अमरावतीचे दिशेने त्यांचेकडील मोटारसायकल  वरून पसार झाले. त्याबाबत पो.स्टे. फेजरपुरा येथे अपराध क्रमांक २५८/२०२५ कलम ३११ भा.न्या. सं. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता





सदर गुन्हा उघडकिस यावा म्हणुन  पोलिस आयुक्त  नविनचंद्र रेड्डी यांनी गुन्हे शाखेला आदेशीत केले होते व  सदर गुन्हयाचा संमातर तपास करीत असतांना विविध ठिकाणचे सि.सि.टी.व्ही. फुटेज चे पाहणी करण्यात आली. तसेच तांत्रीक विश्लेषन करून गुप्त बातमीदाराकडुन खात्री लायक माहीती प्राप्त करून सदर गुन्ह्यातील आरोपींना निष्पन्न करुन ताब्यात घेतले व सदरचा गुन्हा उघडकिस  आणला व गुन्हयातील आरोपी  १) हेमंत ओमकार पेठकर वय १९ वर्ष रा. बुधवारा निळकंठ चौक, अमरावती, २) रोहीत विनोद शेरेकर वय २० वर्ष रा. बुधवारा माता खिडकी, अमरावती, ३) रोहन वासुदेवराव नाईक वय २४ वर्ष रा. खडकाडीपुरा, अमरावती, ४) कृष्णा मंगेश कलाने वय १९ वर्ष रा. औरगंपुरा, अमरावती, तसेच ५) एक विधी संघर्षीत बालक यांना अतिशय शिताफिने ताब्यात घेतले त्यांना सदर गुन्हयामधील मुद्देमालाबाबत बारकाईने विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्हयात वापरलेली एक वाहन त्यांचे ताब्यातुन जप्त करण्यात आले. गुन्हयातील मु‌द्देमाल तसेच गुन्हयात वापरलेले शस्त्र याबाबत माहीती मिळाली असुन पुढील कार्यवाही करीता त्यांना पो.स्टे. फेजरपुरा यांचे ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हयातील इतर ३ आरोपी फरार असुन त्यांचा शोध घेणे कामी पथक रवाना करण्यात आले आहे.



सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे , पोलीस उपायुक्त  कल्पना बारावकर, पोलिस उपायुक्त सागर पाटील, सहा. पोलिस आयुक्त शिवाजी बचाटे, गुन्हे शाखा, पो.नि. बाबाराव अवचार गुन्हे शाखा युनिट २  यांचे नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगाले, पोउपनि संजय वानखडे, पोलीस अंमलदार दिपक सुंदरकर, गजानन ढेवले, आस्तीक देशमुख, मनोज ठोसर, मंगेश शिंदे, संग्राम भोजने, चेतन कराडे, राजीक रायलीवाले, सागर ठाकरे, योगेश पवार, संदीप खंडारे, वेतन शर्मा, राहुल दुधे यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!