
IPL बुकींवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,मुख्य बुकी फरार….
IPL चे क्रिकेट मॅचवर बेटींगचा जुगार खेडणाऱ्या बुकींवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकुन त्यांचे ताब्यातुन दोन मोपेड वाहनांसह एकुण २,६५,९५०/- रु चा मुद्देमाल केला जप्त….
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सध्या क्रिकेटचा महासंग्राम IPL चे सामने सुरु आहे त्यातच यावर जुगार खेळविणारे व खेळणारे याची गिनती न केलेले क्रिकेट बुकी शहरात शहराबाहेर तळ ठोकुन असतात तसेच यामधे झटपट पैसे कमविण्याच्या नादात कितीतरी तरुण आहारी पडलेले दिसतात तर काहींचे संसार रस्त्यावर आल्याचे चित्र दिसते आहे


याअनुषंगाने पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशान्वये असे बुकी शोधुन त्यांचेवर कार्यवाही करण्याचे कडक आदेश सर्व प्रभारी मुख्यतः स्थानिक गुन्हे शाखेस देण्यात आले होते त्यानुसार दि २५ एप्रिल २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा विनोद चौधरी यांचे आदेशाने उप-विभाग पुलगाव परीसरात अवैद्य व्यवसायावर पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गोपनिय माहीती प्राप्त झाली की, प्रफुल रामसेवक पांडे, वय २५ वर्षे, रा. सिंधी (मेघे), वर्धा हा त्याचे साथीदारसह मौजा भिडी येथील नवीन रेल्वे स्टेशन परीसराजवळील एका शेतात बसुन त्यांचे जवळ असलेल्या वेगवेगळया मोवाईल फोनचे माध्यमातुन ग्राहकांसोबत संपर्क करुन सध्या सुरु असलेल्या IPL क्रिकेटचे चैन्नई सुपर किंग्स विरुध्द सनराईज हैद्राबाद या लाईव्ह किकेट मॅचवर स्वतःचे आर्थीक फायदया करीता हारजीतीचा जुगार खेळ खेळत आहे.

अशा माहीतीवरुन त्यांचेवर जुगार कायद्यान्वये छापा टाकला असता सदर ठिकाणी आरोपी १) प्रफुल रामसेवक पांडे, वय २५ वर्षे, रा. सिंधी (मेघे), वर्धा, २) प्रफुल रविंद्र सातपुते, वय ३० वर्षे, रा. गणेशनगर, वर्धा, ३) नितीन रतनलाल शाहु, वय ३३ वर्षे, रा. सोमनाथे लेआउट, वर्धा हे जागीच मिळुन आले. त्यांचे ताब्यातुन १) नगदी २,०५०/-रु, २) एक पॉवर बँक किंमत २,४००/-रु, ३) एक ग्रे रंगाची मोपेड गाडी क्रमांक एमएच ३२ एटी ६७०८ कि १,००,०००/-रु, ४) एक पांढऱ्या रंगाची मोपेड गाडी क्रमांक एमएच ३२एई १८३८ किंमत ८०,०००/-रु, ५) जुगार खेळण्यासाठी वापरलेले पाच वेगवेगळे अॅन्ड्रॉईड मोबाईल किंमत ८१,५००/-रु असा एकुण कि २,६५,९५०/- रु चा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त केला.

यातील वरील सर्व आरोपींना सदर IPL जुगाराबाबत अधिक विचारणा केली असता त्यांनी त्यांचे क्षमतेपेशा मोठे जुगाराचे आकडे हे त्यांचा साथीदार आरोपी क्र ४) अजय उर्फे अज्जु तिवारी रा. वर्धा (फरार) यांचे कडे देत असल्याचे सांगीतले यावरुन चारही आरोपीं विरुध्द पोलिस स्टेशन देवळी येथे कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास सुरु आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी पोउपनि बालाजी लालपालवाले, पोलिस अंमलदार गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, भुषण निघोट, मनिष कांबळे, गोपल बावणकर, अमोल नगराळे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.


