
संशईतांना ताब्यात घेऊन युनीट २ ने जबरी चोरीचे २ गुन्हे केले उघड…
अमरावती शहर गुन्हेशाखा युनिट २ ने जबरी चोरी करणायांना ताब्यात घेवून जबरी चोरीचे २ गुन्हे केले उघडकिस….
अमरावती शहर (प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ०४ मे २०२५ रोजी यातील तक्रारदार मानकलाल सोमानी यांनी पोलिस स्टेशन राजापेठ येथे तक्रार दिली होती की, ते अंदाजे सायंकाळी ६ वा. चे दरम्यान बियाणी कॉलेजकडे वाकींग ला जात असतांना शिवाजी मार्केट कडून अंदाजे १८ ते २० वयोगटातील दोन मुले मोटर सायकलने त्यांचे मागून आले व त्यापैकी मागे बसलेल्या मुलाने त्यांच्या गळयातील सोन्याची चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या हातात चेन न आल्याने त्या मुलाने त्यांच्या हातातील मोबाईल जबरीने हिसकावून साई नगर कडे पळून गेले अशा मानकलाल सोमानी यांचे तक्रारी वरून पोलिस स्टेशन. राजापेठ येथे अप क. १८३/२०२५ कलम ३०४ (२), ३(५) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.


त्याचप्रमाणे दि ०४ मे २०२५ रोजी एक महीला यांचे तक्रारीवरुन त्या कवरनगर कडे जात असतांना दोन अनोळखी मुलाने बाईक वर येवून त्यांच्या हातातील पोक्को कंपनीचा मोबाईल जबरीने हिसकावून नेला अशा तक्रारी वरून सुध्दा पोलिस स्टेशन राजापेठ येथे अप. १८४/२०२५ कलम ३०४ (२), ३(५) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

वरील दोन्ही गुन्हयांचा समांतर तपास वरीष्ठांचे आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट क्र २ करीत असतांना त्यांनी गुप्त बातमीदार नेमुन तसेच गुन्हयाचे तांत्रिक विश्लेषण करून गुन्हयातील आरोपी १) केशव महेश नारायणी, वय १९ वर्ष, रा. मधुसुदन कॉलनी अमरावती, २) संजय श्रावण खीची, वय २० वर्ष, रा. दसरा मैदान, मंदीर मागे अमरावती यांना निष्पन्न करुन ताब्यात घेऊन त्यांना बारकाईने व कसोशिने विचारपुस केली असता त्यांनी सदर चे गुन्हे केल्याची कबूली दिली. त्यांच्या ताब्यातून दोन्ही गुन्हयातील मोबाईल १) पोको कंपनीचा किं.१०,०००/- रू, २) रेडमी कंपनीचा मोबाईल किं १०,०००/- रू तसेच दोन्ही गुन्हयात वापरलेली एम.एच.२७ डी. क्यू. ९२४९ हिरो स्प्लेंडर कंपनीची मोटर सायकल किं ६०,०००/- रू असा एकूण ८०,०००/- रू चा मुददेमाल ताब्यात घेवून पुढील तपासकामी पो. स्टे. राजापेठ यांच्या ताब्यात देण्यात आला.

नमुद अधीक आरोपींची चौकशी केली असता त्यांनी खालील नमुद गुन्हे केल्याची कबूली दिली आहे.१) पो.स्टे. राजापेठ येथे अप क. १८३/२०२५ कलम ३०४ (२), ३(५) भा.न्या.सं २) पो.स्टे. राजापेठ अप. १८४/२०२५ कलम ३०४ (२), ३ (५) भा.न्या.सं.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, अमरावती पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, पोलिस उपायुक्त कल्पना बारावकर पोलिस उपायुक्त सागर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट २ चे पोलिस निरीक्षक. बाबाराव अवचार यांचे नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगोले, सपोनि अनिकेत कासार (सायबर), पोउपनि संजय वानखडे, पोलीस अंमलदार महेंद्र येवतीकर, दिपक सुंदरकर, गजानन ढेवले, आस्तीक देशमुख, मनोज ठोसर, संग्राम भोजने, मंगेश शिंदे, चेतन कराडे, राजीक रायलीवाले, सागर ठाकरे, योगेश पवार, विशाल वाकपांजर, संदीप खंडारे, चेतन शर्मा, राहुल दुधेथे, म.पो.शि. सुषमा आठवले यांनी केली


