
मोबाईल चोरट्यास ताब्यात घेऊन युनीट १ ने सिटी कोतवाली येथील गुन्हा केला उघड…
पोलिस स्टेशन सिटी कोतवाली हद्दीतील इर्वीन चौक ते रेल्वे स्टेशन दरम्यान श्री गजानन मंदीरजवळील चोरीच्या गुन्ह्यांत युनीट १ ने आरोपीस ताब्यात घेऊन त्याचेकडुन मोबाइल, गुन्हयात वापरलेली दुचाकी असा एकुण १,१०,०००/-रू चा मुददेमाल केला जप्त…
अमरावती शहर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १८ मे २०२५ रोजी रात्रीचे ९.३० वा. इर्वीन चौक ते रेल्वे स्टेशन दरम्यान जीतेश श्रीधर पोहोकार वय ३२ वर्षे रा. बोरगाव धर्माळे यांचा मोबाईल व त्यांचे खिशातील ११०/- रू. अज्ञात तीन मुलांनी हिसकावुन घेवुन चोरी करून घेवुन गेले अशा त्यांचे तक्रारी वरून पो. स्टे सिटी कोतवाली येथे अप. क्र. १७८/२०२५ कलम ३०४ (२) भा. न्या. स. गुन्हा नोंद करण्यात आला होता.


सदर गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनीट १ चे करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून गुन्हयातील आरोपीस निष्पन्न करुन त्यास अटक करून त त्याचे पुर्ण नाव विचारले असता त्याने त्याचे नाव रोहीत शंकर खंडारे वय २० वर्षे रा. बेलपुरा अमरावती असे सांगीतले. त्यास विश्वासात घेवुन गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा त्याचे इतर दोन साथीदार मिळून केल्याचे कबुल केले असुन त्याचे ताब्यातुन गुन्हयात वापरलेली डियो गाडी क्रमांक एम एच २७ डि डब्ल्यु ०१५३ किंमत अंदाजे १,००,०००/- रू व चोरलेला सॅमसंग कंपनीचा मोबाइल किंमत अंदाजे १०,०००/- रू हा पोलिस पकडतील या भितीपोटी पो.स्टे. राजापेठ येथे त्यास सापडला आहे असे सांगुन जमा केला होता तो मोबाइल ताब्यात घेवुन फिर्यादी यांचा असल्याची खात्री करण्यात आली आहे. पुढील कार्यवाहीकरीता सदर गुन्हयातील अटक आरोपी व मुददेमाल पोलीस स्टेशन सिटी कोतवाली यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त अरविंद चावरीया,पोलिस उपआयुक्त गणेश शिंदे (परि ०२), पोलिस उपआयुक्त कल्पना बारवकार मुख्यालय), सहायक पोलिस आयुक्त (राजापेठ विभाग) जयदत्त भंवर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट १ चे पोलिस निरीक्षक. गोरखनाथ जाधव, सपोनि मनीष वाकोडे, पोउपनि प्रकाश झोपाटे, पोहवा सतीश देशमूख, पोहवा फिरोज खान, सचिन बहाळे, अलीमउददीन खतीब, नापोशि नाझीमउददीन सैयद, विकास गुढधे, सचिन भोयर,पोशि सुरज चव्हाण, निखील गेडाम, चालक- अशोक खंगार, किशांर खेंगरे, सर्व नेमणूक गुन्हे शाखा युनिट १ यांनी यांनी केलेली आहे.



