अल्पवयीन बालकाचे अपहरण करणारी टोळी जेरबंद…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अल्पवयीन बालकाचे अपहरण करणारी टोळी जेरबंद…

जळगाव (प्रतिनिधी) – अल्पवयीन बाळाचे अपहरण करणाऱ्या टोळीला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने पकडण्यात जळगाव पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन भाग-५ गुरन. ९६/२०२४ भादवि.क.३६३,४५१ गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.





या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.२३एप्रिल) रोजी रात्री ०१:३० ते ०२:०० वाजेच्या सुमारास साकेगाव ता.भुसावळ गावात एका घरात दोन अनोळखी इसमांनी प्रवेश करुन झोक्या मध्ये झोपवलेल्या आठ महिन्याच्या अल्पवयीन बालकाचे त्याचे पालकांचे संमती शिवाय अपहरण करुन नेले होते त्या अनुषंगाने भुसावळ तालुका पोलीस स्टेशन भाग-५ गुरन. ९६/२०२४ भादवि.क.३६३,४५१ गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयांचे गांभिर्य ओळखुन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सदर गुन्हा तात्काळ उघडकीस आणणे कामी एसडीपीओ कृष्णकांत पिंगळे, पो.नि. किसनजन पाटील, पो.नि.बबन जगताप यांना सुचना व मार्गदर्शन केले होते.



त्या अनुषंगाने मिळालेल्या गोपनीय माहिती चे आधारावर नारायण नगर, घोडेपिर बाबा दर्गाजवळ, मोरया हॉलच्या समोर, शिवपुर कन्हाळा रोड भुसावळ येथील अलका जिवन स्पर्श फांउडेशन या ट्रस्ट मध्ये छापा टाकला असता सदरचे आठ महिन्याचे अल्पवयीन बालक मिळुन आले. सदरचे बालक पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी याचे सुचना व मार्गदर्शनाने त्याचे पालकांचे स्वाधिन करण्यात आलेले आहे.



सदर गुन्हयामध्ये १) दिपक रमेश परदेशी, (वय ३२ वर्षे), रा.नारायण नगर, घोडेपिर बाबा दर्गाजवळ, मोरया हॉलच्या समोर, शिवपुर कन्हाळा रोड भुसावळ, २) अमीत नारायण परिहार, (वय ३० वर्षे), रा.नागसेन कॉलनी, कंडारी ता. भुसावळ, ३) कुणाल बाळु वाघ (वय १९ वर्षे), रा.शिंगारबडीं साकेगाव ता. भुसावळ, ४) बाळु पांडुरंग इंगळे, (वय ५१ वर्षे), रा.ऑर्डन्स फॅक्टरी वरणगाव, सुशिल नगर, दर्यापुर शिवार, ता. भुसावळ, ५) रिना राजेंद कदम, (वय ४८ वर्षे) रा.नारायण नगर, घोडेपिर बाबा दर्गाजवळ, मोरया हॉलच्या समोर, शिवपुर कन्हाळा रोड भुसावळ यांना अटक करण्यात आलेली आहे. तपासामध्ये ०१ पाहीजे आरोपी तसेच दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झालेले आहे. सदर गुन्हया मध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपी विरुध्द यापुर्वी खुन, खंडणी, जबरीचोरी, घर फोडी, मारामारी, चोरी व आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. यातील आरोपी बाळु इंगळे हे पोलीस विभागामध्ये नंदुरबार जिल्हा मध्ये बिनतारी संदेश विभागामध्ये पोलीस हवलदार या पदावर कार्यरत आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेडडी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांचे मार्गदर्शनाखाली,उपविभागिय पोलिस अधिक्षक कुष्णकांत पिंगळे, पो. नि. किसन नजन पाटील, पो.नि. बबन जगताप, सपोनि. विशाल पाटील, सफौ. विठ्ठल फुसे, पोहेकॉ. युनुस शेख, प्रेमचंद सपकाळे, वाल्मीक सोनवणे, दिलीप जाधव, संजय भोई, संजय तायडे, पोना. नितीन चौधरी, जगदीश भोई, राहुल महाजन, सफौ.सादीक शेख, पोहवा उमाकांत पाटील, रमन सुरळकर, योगेश माळी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, अमर आढाळे, राहुल भोई, पोउपनिरी. वाघमारे व त्यांचे पथकाने कारवाई केलेली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!