गोतस्करी रोखण्यासाठी अहमदनगर पोलिस अधीक्षकांचे महत्वाचे पाऊल…
अहमदनगर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,नगर जिल्ह्यात गोवंश जनावरांची कत्तल रोखण्यासाठी जिल्हा पोलिस आणि महसूल प्रशासनाने मोठे पाऊल उचललेले असून नेवासा येथील गोवंश जनावरांची कत्तल करून विक्री करणाऱ्या एका नऊ जणांच्या टोळीला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
प्राप्त माहीतीनुसार, नदीम सत्तार चौधरी, फिरोज अन्सार देशमुख, शोएब अलीम खाटीक, खलील उस्मान चौधरी, अबू शहाबुद्दीन चौधरी, मोईन अबू चौधरी, जबी लतीफ चौधरी, अन्सार सत्तार चौधरी आणि अखिल जाफर चौधरी (सर्व रा. नेवासा) अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
सर्व आरोपींच्या विरोधात नेवासा आणि श्रीरामपूर पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल आहेत. सदर टोळीचा बिमोड करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी कठोर पाऊल उचललेले असून आरोपींच्या दहशतीमुळे सर्वसामान्य नागरिक देखील तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते. पोलिस अधिनियम 1951 चे कलम 55 नुसार जिल्ह्याच्या हद्दीतून सर्वांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेले असून नेवासा पोलिस ठाण्याकडून हा प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता.