
दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत डाबकी रोड पोलिसांनी जप्त केले ४० किलो गोंमास,दोघे अटकेत….
डाबकी रोड पोलिसांची धडक कारवाई, गोवंश मांस विक्री करीता घेवून जाणारे दोन इसमांना पकडून गोमांस केले जप्त….
अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन डाबकी रोड अकोला येथील पोहवा असद खान,गोपाल डोंगरे, सुनिल टोपकर,दिपक तायडे, नापोशि प्रविण इंगळे पोशि मंगेश गिते असे दि.(२३)रोजी पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना प्राप्त गुप्त बातमीदार यांचे कडून प्राप्त माहितीवरुन अगरवेस व श्रीवास्तव चौक येथे वेगवेगळे ठिकाणी पंचासमक्ष नाकाबंदी करुन पोहवा असद खान,गोपाल डोंगरे यांना अगरवेस येथे केलेले
नाकाबंदी दरम्यान एक इसम पांढरी पिशवी हातामध्ये घेवून येतांना दिसला वरुन सदर ईसमास त्यांनी ताब्यात घेवून त्याची जवळील प्लॉस्टीक पोत्याची पाहणी केली असता त्यामध्ये २० किलो गोवंश मांस कि. अं. ४०००/रु. चे मिळून आले. आरोपी नामे अब्दुल वहिद अब्दुल शहीद वय ५३ वर्षे रा. सलीम किराणा शॉप जवळ खैरमोहम्मद प्लॉट अकोला याचे सदरचे कृत्य महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५(क),९(अ) प्रमाणे होत असल्याबाबत पोहवा असद खान, यांनी लेखी फिर्याद अप नं १२९/२०२४ कलम ५ (क), ९ (अ)महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम प्रमाणे गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.तसेच सुनिल टोपकर, दिपक तायडे यांनी श्रीवास्तव चौक येथे नाकाबंदी दरम्यान प्राप्त माहितीनुसार एक पांढरे रंगाचे पोते हातामध्ये असलेले इसमास ताब्यात घेवून त्याचे कडील पोत्याची पाहणी केली असता त्यामध्ये १८ किलो गोवंश मांस कि. अं. ३६००/रु चे मिळून आल्याने इसम नामे नासीर खान हबीब खान वय ४५ वर्षे रा. अन्न किराणाशॉप जवळ भगवतवाडी गल्ली क्रं १ अकोला यांचे विरुध्द पोहेकॉ १३८३ यांनी तकार
दिल्याने अप नं १३०/२०२४ कलम ५ ( क ), ९ (अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम प्रमाणे गुन्हयाची नोंद
करण्यात आली आहे.
सदरच्या दोन्ही गोवंश कारवाई ह्या पोलिस अधिक्षक बच्चन सिंग, अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे,सहा. पोलिस अधिक्षक गोकूळ राज, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग अकोला, यांचे मार्गदर्शनाखाली पोनि सुरेंद्र बेलखेडे पोहवा असद खान,गोपाल डोंगरे, सुनिल टोपकर,दिपक तायडे, नापोशि प्रविण इंगळे, पोशि मंगेश गिते पो स्टे डाबकी रोड अकोला यांनी केली.




