
घराचे अंगनात गांजाची लागवड करणारा दहीहांडा पोलिसांचे ताब्यात…
घरी लाखोंच्या गांजाची लागवड करणारा दहीहांडा पोलिसांच्या ताब्यात,तब्बल १२ किलो गांजा जप्त…
अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि.२९ रोजी दहीहांडा पोलिस स्टेशन हददीत पेट्रोलींग करीत असतांना ठाणेदार सहा. पोलिस निरीक्षक योगेश वाघमारे यांना चोहट्टा बिट हददीतील ग्राम करतवाडी येथे एका इसमाने प्रतिबंधित अशा गांजाच्या झाडाची लागवड स्वत:चे घराचे अंगणात केली असलेबाबत खात्रीलायक माहिती मिळाली. सदर माहिती ताबडतोब पोलिस अधिक्षक,अपर पोलिस अधिक्षक,सहा पोलिस अधिक्षक तथा
उपविभागीय पोलिस अधिकारी अकोट यांना दिली. सदरचा प्रकार हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलिसअधिक्षक यांनी मिळालेल्या माहितीची खातरजमा करून एनडीपीएस कायद्या अंतर्गत कडक
कार्यवाही करण्याबाबत परवानगी दिली लागलीच ठाणेदार योगेश वाघमारे यांनी एक पथक तयार केले. सदर कार्यवाही करीता उपविभागीय पोलिस अधिकारी अनमोल मित्तल यांचे उपस्थितीत पोलिस पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे ग्राम करतवाडी येथे छापा टाकला असता इसम


अजाबराव रामदास किरडे वय ४६ वर्ष रा करतवाडी रेल्वे

याने स्वतःचे घराचे अंगणात कंपाउंड वॉलचा आडोसा घेवुन १२ गांजाची झाडे लावल्याची आढळले. पोलिस पथकाने सदर झाडांचा पंचासमक्ष पंचनामा करून १२ किलो वजनाची सुमारे १,२०,०००/- रूपये किंमतीची गांजाची झाडे ताब्यात घेवुन आरोपी अजाबराव
किरडे याला अटक केली आरोपीला मा. न्यायालय समक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी रिमांड मंजूर केला आरोपी कडुन अजुन काही माहिती निष्पन्न होते का याचा तपास दहीहांडा पोलिस करीत आहेत.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक बच्चनसिंह,अप्पर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे,सहाय्यक पोलिस अधिक्षक अनमोल मित्तल यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलिस निरीक्षक योगेश वाघमारे, पोउपनि अरून मुंढे, सफौ अंबादास नेरकर, पोहवा गोपाल अघडते,
सुधाकर सिरसाट, शरद सांगळे, अनिल भांडे, कमोद लांडगे, पोशि योगेश करनकार, रामेश्वर भगत, निलेश देशमुख, मपोशि श्रध्दा वानखडे चालक सफौ प्रकाश महाजन, पोहवा सुधीर कोरडे, पोशि हेमंत दासरवार यांनी केली.



