
कत्तलीसाठी जाणारे गोवंशीय जनावरांची वाहतुक करणारे वाहन स्थागुशा पथकाने पकडले…
गोवंशीय जातीचे जनावरांची निर्दयतेने कोबुंन अवैधरित्या वाहतुक करून कत्तली करीता घेवुन जाणारे एकुण २५ गोवंश जातीचे जनावरांची सुटका तसेच दोन चारचाकी वाहणासह एक आरोपीस अटक, एकुण १९,०४,०००/- रू मुददेमाल जप्त…
अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त की,अकोला जिल्हात मोठया प्रमाणात गोवंश जातीचे जनावरे वाहतुक करून कत्तली करीता घेवुन जाण्याचे प्रमाणे वाढत असल्याने पोलिस अधिक्षक अकोला यांनी आदेशित करून त्यास प्रतीबंध करणे बाबत सुचना
दिल्याने स्थानिक गुन्हे शाखा, प्रमुख शंकर शेळके यांनी गोवंश कार्यवाही करीता पथक गठीत केले. या पथकाने गोपणीय बातमीदाराकडुन माहीती घेवुन आज दि ०९/०२/२०२४ रोजी पो स्टे रामदास पेठ हददीतील कागजीपुरा व मोमीनपुरा भागात नाकाबंदी करून गोवंशीय जनावरे कत्तली करीता घेवुन जाणार असल्याचे माहीतीवरुन दोन चार चाकी मालवाहू वाहन पकडुन त्या मध्ये २५ गोवंशीय जातीची जनावरे की अं ५,०४,०००/-रू तसेच गोवंश वाहतुकी करीता वापरण्यात आलेली दोन चार चाकी मालवाहू वाहण की अं १४,००,०००/- रु असा एकुण १९,०४,०००/- मुददेमाल हस्तगत करून आरोपी नामे


मोहम्मद सुफीयान मोहम्मद नासीर वय २१ वर्ष खडकपुरा जुनी वस्ती मुर्तीनापुर जि अकोला

यास पुढील तपास कामी पो स्टे रामदास पेठ यांचे ताब्यात देण्यात आले तसेच नमुद गोवंश हयांना पुढील संगोपणा करीता आदर्श गौशाळा म्हैसपुर, अकोला येथे ठेवण्यात आले आहे. २०२४ या चालु वर्षात ४० दिवसात एकुण १४ गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकुण ५९ गोवंशांना जिवदान देण्यात आले व एकुन किंमत ३५,८८,१३०/-रु मुद्देमाल जप्त करण्यात आले. तसेच २०२३ मध्ये एकुण २१९ गुन्हे दाखल करण्यात आले असुन ६३७ गोंवश जनावरांना जिवदान देवुन एकुण ३,०२,३८,४१५/-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यापुढे सुध्दा वरीष्ठांचे आदेशाने गोवंश
जनावरे कत्तली करीता आणण्या-या टोळीवर कठोर कार्यवाही करण्यात येईल.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक बच्चनसिंह ,अपर पोलिस अधिक्षक,अभय डोंगरे यांचे मार्गदर्शना खाली पो.नि.शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा, सपोनि कैलास भगत, पोउपनि गोपाल जाधव, पोलीस अंमलदार दशरथ बोरकर, फिरोज खान, प्रमोद डोईफोडे, भास्कर धोत्रे, गोकुल चव्हाण, रवि खंडारे, अब्दुल माजीद, सुलतान पठान, खुशाल नेमाडे, अविनाश पाचपोर, महेद्र मलीये, शेख
वसीमोददीन, इजाज अहमद, लीलाधर खंडारे, मो. अमिर, अमोल दिपके, स्वप्नील खेडकर यांनी केली.



