शेतकऱ्याशी ट्रक मालकाने केलेला बनाव स्थागुशा ने केला उघड…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

चोहट्टा येथील फसवणुक झालेल्या शेतक-याचा १४ लाखांचा माल स्थानिक गुन्हे शाखे कडुन ०१ दिवसात परत,आरोपीने केलेला बनाव उघड….

अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. (२२) रोजी फिर्यादी राधेश्याम मधुकर पाटकर, वय ३३ वर्ष रा. चोहट्टा बाजार ता. आकोट जि. अकोला यांनी श्रीकृष्ण पंडितराव लटपटे वय ३७ वर्ष रा. मलकापुर भिल ता. अकोट ह.मु. केलपानी ता. अकोट जि. अकोला याचे पांढ-या रंगाचे आयशर गाडी मध्ये महालक्ष्मी दाल मिल नवलखा इंदौर मध्य प्रदेश येथे खाली करणे कामी भरून दिलेला १४८. १५ क्विंटल तुर किं. १४८१५००/रू हा दिनांक २३/०२/२०२४ रोजीचे रात्री पर्यंत इंदौर येथे न पोहचविल्याने
फिर्यादी यांनी विश्वासाने सोपविलेला तुर हा शेतमाल इंदौर येथे न पोहचवता परस्पर कोठेतरी विक्री करून गाडी जळाल्याचा बनाव
केला आहे अश्या फिर्यादी यांचे तक्रारीवरुन वरून पो.स्टे. दहिहंडा येथे दि. (२५) रोजी अप क्र. ९१/२०२४ कलम ४०७,४२० भा.दं.वि. चा गुन्हा दाखल झाला.
सदर घटनेच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक  बच्चन सिंह यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन स्थानिक गुन्हे शाखा अकोला चे प्रभारी अधिकारी पो. नि. शंकर शेळके यांना स्था. गु. शा. अकोला येथील पथक तयार करून सदर गुन्हा उघडकिस आणण्याबाबत मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने दिनांक २६/०२/२०२४ सोमवार रोजी सकाळी १०/०० वाजता स्था.गु.शा. पो. नि. प्रमुख शंकर
शेळके व त्यांचे पथका सह सर्व घटनास्थळांना भेटी दिल्या व गोपनिय पध्दतीने तपास केला असता आरोपीने स्वतः चा ट्रक स्वतः
पोपटखेड हद्दीत दरीत ढकलुन देवुन जाळुन टाकल्याचे व त्याआधी ट्रक मधील तुर क्रॉसिंग करून घेवुन स्वतः च्या मालकीचे दुस-या ट्रक मध्ये भरून सदर ट्रक मराठवाडयात पाठविल्याचे निष्पन्न झाले.
त्या अनुषंगाने तपासाचे चक्र फिरवुन आरोपीचा मराठवाडया कडे गेलेला ट्रक व आरोपी शिवम नागनाथ होळंबे वय २७ वर्ष रा. मलकापुर, केलापानी ता. अकोट जि. अकोला यास वाशिम येथील स्था. गु.शा यांचे मदतीने ताब्यात घेवुन जप्त करण्यात आला. तसेच अब्दुल इकबाल अब्दुल गफ्फार वय ५० वर्ष रा. गाजी प्लॉट अकोट व आरोपी नामे अन्सारोद्दीन हसिरोद्दीन वय ३० वर्ष रा. पणज ता. अकोट जि. अकोला यांचे ताब्यातुन ३५ पोते तुर जप्त करून सर्व ०४ आरोपीसह एकुण मुद्देमाल अंदाजे १२ टन तुर किंमत १३ लाख रूपयांची व जप्त केलेला टूक अंदाजे कि. २४ लाख रूपये असा एकुण ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त करून पो.स्टे. दहिहंडा यांचे ताब्यात देण्यात आला. आरोपीने चिखलदारा पो.स्टे. ला अपघात रजिस्टर ला खोटी नोंद करवुन बनावट प्रकार केल्याचा प्रकार सदर तपासात उघडकिस आला.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक  बच्चन सिंह ,अपर पोलिस अधिक्षक, अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला पोउपनि. राजेश जवरे, स्थानिक गुन्हे शाखा येथील अंमलदार दशरथ बोरकर, प्रमोद ढोरे, भास्कर धोत्रे, सुलतान पठान, उमेश पराये, प्रमोद डोईफोडे, गोकुळ चव्हान, अक्षय बोबडे,वसिमोद्दीन, अन्सार अहेमद, स्वप्निल खेडकर, लिलाधर खंडारे, अनिल राठोड, स्वप्निल चौधरी तसेच सायबर सेल चे अंमलदारआशिष आमले यांनी पार पाडली. तसेच दहिहंडा ठाणेदार योगेश वाघमारे व अंमलदार प्रमोद लांडगे, सुदेश यादव, रामेश्वर भगत हे देखील सदर गुन्हयांचा समांतर तपास करत होते.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!