
धक्कादायक – बापाने व भावानेच हातपाय बांधुन गळा आवळुन केला खुन..
जन्मदात्या बापानेच धाकट्या मुलाच्या साथीने हातपाय बांधुन गळा दाबून केला खुन,२४ तासाचे आत खुनाची केली उकल..
पिंजर(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन पिंजर हद्दीत ग्राम टिटवा येथील खुनाच्या गुन्हयाची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय मिळालेल्या माहीतीनुसार दि. ०९/०२/२०२४ रोजी पो.स्टे. पिंजर येथे फिर्यादी पवन विठ्ठलराव जाधव वय ४६ वर्ष व्यवसाय : पोलिस पाटील रा. टिटवा ता. बार्शिटाकळी जि. अकोला यांनी तक्रार दिली कि, गावातील नागोराव गांवडे यांचे राहत्या घराच्या खोली मध्ये त्यांचा लहान मुलगा संदीप गावंडे याचे हात पाय बांधुन ठेवलेले दिसत असुन तो मृत अवस्थेत आहे.


अशा त्यांनी दिलेल्या फिर्यादेवरुन पो.स्टे. ला अप. क्र. ५६ / २०२४ कलम ३०२ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा नोंद केला. त्यास कोणी मारले याबाबत माहिती नसल्याने अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. सदर घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी,मुर्तिजापुर मनोहर दाभाडे,स्थागुशा अकोला चे प्रभारी अधिकारी पो.नि. शंकर शेळके, व पो.उप. नि. गोपाल जाधव तसेच
पो.स्टे. पिंजय चे ठाणेदार स.पो.नि. राहुल वाघ व पोउपनि बंडु मेश्राम यांनी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ जावुन पाहणी केली व मृतक याचे वडीलांना विचारपुस केली असता त्यांनी सांगितले कि, ते दिनांक ०८/०२/२०२४ रोजी त्यांचे पत्नीची
अचानक तब्येत खराब झाल्याने पत्नी मोठा मुलगा व सुन व मुलगी असे सरकारी दवाखाना अकोला येथे उपचाराकरीता गेले होते व घरी फक्त त्यांचा मुलगा म्रुतक संदीप हा घरीच होता व त्याचेच सांगण्यावरून त्यांनी लोखंडी गेट बाहेरून कुलुप लावुन सकाळीच निघुन गेले होते व रात्रभर दवाखान्यामध्ये मुक्कामी होतो. दिनांक ०९/०२/२०२४ रोजी सकाळी ते परत आले असता घरी येवुन लोखंडी गेट चे कुलुप उघडुन घराच्या आत जावुन पाहिले असता घरातील एका खोलीत माझा लहान मुलगा संदीप याचे हात पाय तोंड बाधुन मृत अवस्थेत मिळुन आला असे सांगितले
त्यानंतर सदर गुन्हयाच्या तपासात पोलिसांना यातील मयत नामे संदीप नागोराव गावंडे वय २४ वर्ष रा. टिटवा याचे वडील व भाऊ यांच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्यांची सखोल विचारपुस केली असता परिस्थीती जन्य पुरावा व साक्षीदारांचे जाब जबाबावरून असे निष्पन्न झाले कि यातील मयत याचे गावातील एका मुलीसोबत प्रेम संबंध होते. त्या प्रेम संबधामुळे आपली समाजात बदनामी होईल अशी त्यांची धारणा झाल्याने यातील आरोपी

०१) म्रुतकाचे वडील नामे नागोराव कडनाजी गावंडे वय ६० वर्ष

२) मयतचा मोठा भाऊ नामे प्रदीप उर्फ सोनु नागोराव गावंडे वय ३२ वर्ष
यांनी दिनांक ०८/०२/२०२४ रोजी यातील मयत यास राहत्या घरात मारहाण केली व इलेक्ट्रीक वायर ने व कापडी दुपट्ट्याने ने हात पाय तोंड बांधुन त्याचा गळा ईलेक्ट्रीक केबल ने आवळला. त्यामुळे तो मरण पावला. सदर मृतकाचे प्रेत शवविच्छेदन केले असता वैद्यकिय अधिकारी यांचे अभिप्राय प्राप्त होताच सदर मृतकाचा मृत्यु गळा आवळुन व डोक्याला गंभीर ईजा होऊन झाल्याचे अभिप्राय दिल्याने वर नमुद दोन्ही आरोपी यांना अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांचा दिनांक १२/०२/२०२४ पावेतो पोलिस कोठडी मंजुर केली आहे पुढील तपास पिंजर पोलिस करीत आहेत
सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक बच्चन सिंह ,अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी मुर्तिजापुर मनोहर दाभाडे,स्थानिक गुन्हे शाखा चे प्रभारी पो.नि शंकर शेळके, पो.स्टे. पिंजर ठाणेदार राहुल वाघ व पो.उप.नि. गोपाल जाधव LCB अकोला, पो.उप.नि. बंडु मेश्राम पो.स्टे. पिंजर व पोलिस अंमलदार नामदेव मोरे, चंद्रशेखर गोरे, भगवान मात्रे, पंकज एकाडे, व स्थागुशा चे पोलीस अंमलदार दशरथ बोरकर, रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, लिलाधर खंडारे चालक प्रशांत कमलाकर यांनी ही कारवाई केली.


